India Languages, asked by dishapawar7715, 1 year ago

शब्द हरवले तर निबंध लेखन

Answers

Answered by pranvi2704
1

पानावरले तीन प्रसंग वाचलेत?

त्यातल्या एकातनं किंवा त्यासारख्याच दुस:यातनं तुम्ही गेला असालच कधीतरी.

हे असलं सगळं अवतीभोवती घडत असताना दुसरीकडं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याची हालचाल सुरू झालीय. खरं तर मराठीतल्या शब्दांच्या खजिन्याची कल्पनाच नाही आपल्याला.

वाढतं नागरीकरण, फोफावलेलं काँक्रीटचं जंगल आणि त्यातली फ्लॅट संस्कृती, शेती-गावगाडय़ाचं यांत्रिकीकरण, तंत्रज्ञानाची वाढती आस, इंटरनेटनं जवळ आणलेलं जग यामुळं अस्सल मराठीतले अनेक शब्द आपण हरवलेत. मराठीचं माधुर्य दाखवणारे असंख्य शब्द काळाबरोबर अस्ताला जाऊ लागलेत, पण त्याचवेळी तंत्रज्ञानाच्या मायाजालानं आणलेल्या नव्या शब्दांची भर मराठीत पडू लागलीय.

- नेमकं हेच हेरून सांगलीतल्या शांतिनिकेतन लोकविद्यापीठानं आगळावेगळा उपक्रम राबवला. या संकुलातल्या यशवंतराव चव्हाण ग्रंथालयानं मराठी राजभाषा दिनाचं औचित्य साधून शब्दशोध स्पर्धा घेतली. प्राथमिक, माध्यमिक स्तरावरच्या विद्यार्थी आणि शिक्षकांना त्यात सहभागी करून घेतलं.

मराठीत इतर भाषेतून आलेले शब्द, हरवलेले शब्द, ग्रामीण मराठीतील शब्द, अवघड, सरकारी आणि द्विअर्थी शब्द अशा गटात शब्द संकलित करून देण्याचं आवाहन करण्यात आलं. पाचशेवर मुलांनी आणि पन्नासभर शिक्षकांनी तब्बल एकोणीस हजार शब्दांचं संकलन केलं. त्यातले अडीच हजारांवर शब्द काळाच्या ओघात हरवण्याच्या मार्गावर असल्याचं, तर हजारावर शब्द चक्क हरवल्याचं दिसून आलं.

शेतीवाडीचं यांत्रिकीकरण होऊ लागलं, गावगाडय़ाला नागरीकरणानं भरकटून टाकलं, खेडय़ापाडय़ातली बलुतेदारी मागं पडली, फ्लॅट संस्कृतीनं नात्यांमध्ये दरी निर्माण केली.. तसं गावगाडय़ाला चिकटलेले मराठीतले शब्द हरवू लागले. गावाकडचं घर बदललं आणि ‘बंगलो स्किम’ आली.

- मग ओटा, पडवी, न्हाणीघर, माजघर, शेजघर, माळवद, वासं-आडं, दिवळी, खुंटी, फडताळ, परसदार, पोत्यारं हे शब्द विस्मरणात गेले.

बैलगाडी जाऊन ट्रॅक्टर-यांत्रिकी अवजारं आल्यानं औत, रूमणं, चाडं, लोढणा, वेसण, झूल, तिफण, जू, वादी, कासरा (लांब दोर), दावं (लहान दोरखंड), चराट (बारीक दोरी) या शब्दांना आपण हरवून बसलो. विहिरीवरची मोट गेली, पंप आले. परिणामी मोट, नाडा, शिंदूर, धाव, दंड, ओपा, पलान हे शब्द दिसेनासे झाले. खुरपणी, मोडणी, मोगडणी, उपणणी, बडवणी, खुडणी, कोळपणी, दारं धरणं, खेट घालणं, माळवं यांचा अर्थ अलीकडच्या पिढीला समजत नाही. रास, सुगी, गंजी, कडबा, पाचुंदा, बोंडं, सुरमाडं, भुसकट, शेणकूट, गव्हाण या शब्दांचंही तसंच! धान्य दळायचं दगडी जातं, खुट्टा, मेख हेही काळाच्या पडद्याआड चाललेत.

साळुता आणि केरसुणी याऐवजी झाडू आला. चपलेला पायताण, गोडेतेलाला येशेल तेल, टोपडय़ाला गुंची म्हटलं जायचं, हे आता सांगावं लागतं.

गावंदर, पाणंद, मसनवाट हे शब्द नागरीकरणामुळं मागं पडले. बलुतेदारीतून आलेली चांभाराची रापी, सुताराचा वाकस, कुंभाराचा आवा, लोहाराचा भाता, ढोराची आरी, बुरूडाची पाळ्ळी ही हत्यारांची नावं आता कुणाला आठवतात?

पतीला दाल्ला (दादला), पत्नीला कारभारीण, सास:याला मामंजी, सासूला आत्यासाब, नणंदेला वन्स, बहिणीच्या पतीला दाजी म्हणतात, हे आता नव्या पिढीला सांगावं लागतं, नाही का?

स्वयंपाकघराचं किचन झालं आणि कोरडय़ास (कोरडय़ा पदार्थासह खायची पातळ भाजी), कालवण (ज्यात कालवून खायचे असा पातळ पदार्थ), माडगं, डिचकी, शिंकाळं, उतरंड, डेरा, दुरडी, बुत्ती, चुलीचा जाळ, भाकरीचा पापुद्रा, ताटली, उखळ हे शब्द नागर संस्कृतीनं बाजूला सारले.

रविवार हा सुट्टीचा दिवस. निवांत असण्याचा

दिवस म्हणून तो आयतवार (आईतवार), तर गुरुवार म्हणजे बृहस्पतीवार. त्याचा अपभ्रंश होऊन बेस्तरवार झाला.

पहाटेच्या वेळेला ‘झुंझुरकं’, सकाळी लवकर म्हणजे ‘येरवाळी’ किंवा ‘रामपारी’ आणि सायंकाळला ‘कडुसं (कवडसे) पडताना’ अशी शब्दयोजना होती.

अंगदट (बळकट), दीडकं-औटकं (एकपासून शंभर्पयतच्या संख्येची दीडपट-साडेतीनपट संख्या दाखवणारं कोष्टक), झोंटधरणी (भांडण), पेव (धान्य साठवण्याचं साधन) हे शब्दही आताशा हरवलेत.

इस्कोट (बिघडवणं), सटवाई (नशिब लिहिणारी देवता), सांगावा (निरोप), गलका (गोंगाट), हेकना (चकणा), मढं (मृतदेह), पल्ला (अंतर), शिमगा (होळी किंवा शंखनाद), चिपाड (वाळलेला ऊस), अक्काबाईचा फेरा (दारिद्रय़), अक्करमाशा (अनौरस), अवदसा (दुर्दशा), इडा-पीडा (सर्व दु:ख), कागाळी (तक्रार), चवड (रास, ढीग), ङिांज्या (केस), वंगाळ (वाईट), डोंबलं (डोकं), हुमाण (कोडं), भडभुंज्या (चिरमुरे, लाह्या भाजणारा) ही मराठी भाषेला ग्रामीण भागानं दिलेल्या शब्दभेटीतली वानगीदाखल उदाहरणं. या शब्दांना जसा गावाकडंच्या मातीचा गंध आहे, तसा बोलीभाषेचा गोडवाही आहे. क्षुधा (भूक), लब्धप्रतिष्ठा (प्रतिष्ठाप्राप्त), अजानबाहू (उभ्या अवस्थेत गुडघ्यार्पयत हात पोहोचणारा), अष्टघ्राण (अतिशय दरुगधी), प्रमेय (सिद्धांत), छिद्रान्वेषण (दोष शोधणं), परा्मुख (तोंड फिरवलेला), यदृच्छालाभ (आकस्मिक लाभ), श्मश्रू (हजामत), श्रुतकीर्ती (प्रख्यात), सुषुप्ती (गाढ निद्रा), खग (दुधारी तलवार) हे मराठीतले अवघड शब्द वापरायचं धाडस सहसा कुणी करत नाही.

मायमराठीला इतर भाषांनीही देणगी दिलीय. इतर भाषांतून मराठीत येऊन मराठी बनलेल्या शब्दांची जंत्रीही मोठी रंजक दिसते. हॉटेलसोबत किचन, हॉस्पिटलसोबत डॉक्टर, नर्स, पेशंट, इंजेक्शन, शर्ट-पॅण्ट, बॅट-बॉल, फोन-मोबाइल, मशीन, कॅलेंडर, टीव्ही, रेडिओ, व्हीडीओ, थिएटर, स्टिरिओ, रेल्वे-बस असे असंख्य शब्द इंग्रजीतून आले. पोतरुगीज भाषेनं बटाटा, बिस्किट, हापूस, चावी, पगार अशा शब्दांची भर मराठीत घातलीय.

खर्च, साहेब, हुकूम, दफ्तर, जाहीर, अजर्, अबलख (दोन रंगांचा), आदब (सन्मान), इरादा (हेतू), इनाम (बक्षीस), कलम (बाब, लेखणी), किताब (पुस्तक, पदवी), खबर (बातमी) हे तर अरबी भाषेतून मराठीत आलेत.

Similar questions