World Languages, asked by prafuldhandole, 11 months ago

(१) शब्दजाल पूर्ण करा : (Complete the web diagram :)
(i)
मातीची वैशिष्ट्ये

Answers

Answered by Nishika20
3

Answer:

मृदा म्हणजे माती नव्हे. अपक्षय झालेल्या खडकांचा भुगा, अर्धवट किवा पूर्णपणे कुजलेले सेंद्रिय पदार्थ व असंख्य सूक्ष्म जीव मृदेमध्ये असतात. मृदेत जैविक आणि अजैविक घटकांमध्ये सातत्याने आंतरक्रिया घडत असतात. वनस्पतींच्या वाढीस आवश्यक असणारी पोषक द्रव्ये त्यांना मृदेमधून मिळतात. मृदा हि एक परिपूर्ण परिसंस्था आहे. याउलट माती हा एक पदार्थ आहे. थोडक्यात काय तर कुंभार वापरतो ती माती आणि शेतकरी वापरतो ती मृदा. शेतकरी मृदा परिसंस्थेचा वापर करतो तर कुंभार माती या परिसंस्थेचा वापर करतो. मृदेच्या निर्मितीमध्ये मूळ खडक, प्रादेशिक हवामान, जैविक घटक, जमिनीचा उतार व कालावधी हे घटक विचारात घेतले जातात. या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामातून मृदानिर्मिती होते.

माती ही वेगवेगळे खनिज, सेंद्रिय वस्तू, वायू, तरल पदार्थ व अगणित सूक्ष्म जीवांचे मिश्रण असते, जे एकत्रितपणे पृथ्वीवरच्या जीवनास सहाय्यीभूत होतात. नैसर्गिकरित्या असणाऱ्या मातीची चार प्रमुख कार्ये आहेत. ती वनस्पती उगविण्याचे व वाढीचे एक माध्यम आहे. ती पाण्याचे धारण, पुरवठा व शुद्धी करते. पृथ्वीच्या वातावरणात ती बदल घडवून आणते. ती जीवांचे वसतीस्थान आहे, हे सर्व प्रकार सरतेशेवटी मातीत बदल घडवून आणतात. मातीचे प्रकार रेगुरमृदा, तांबडी मृदा, काळी मृदा इ प्रकार आहेत. मातीस पृथ्वीची त्वचा म्हणतात. तसेच ही एक घन, वायू व पाणी(तरल पदार्थ) धरून ठेवण्याची एक त्रिस्तरीय प्रणाली समजल्या जाते

Answered by rehmat8585
3

Answer:

picture

Explanation:

it's has thefki gayi

Similar questions