शब्दकोश पाण्याची उद्देश्य लिय
in marathi
Answers
Answer:
पाणी हे एक नैसर्गिक संसाधन असून सजिवांच्या अस्तित्वासाठी पाणी अत्यंत उपयुक्त आहे. मानवाच्या शरीराच्या ७० टक्के वजनास पाणी कारणीभूत असते. पृथ्वी तलावरील एकूण उपलब्ध पाण्यापैकी ९७ टक्के पाणी हे समुद्रात असते व ते क्षारयुक्त असते. फक्त ३ टक्के पाणी हे गोड्या स्वरूपात असते.
या तीन टक्क्यातील ६९ टक्के पाणी हे हिमशिखरांमध्ये गोठलेल्या स्वरूपात असते. ३० टक्के पाणी हे भूगर्भात असते व उर्वरित १ टक्का पाणी भूपृष्ठावर उपलब्ध असते. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जनता ही बहुंतांशी भूजल स्त्रोतांवर अवलंबून आहे.
पाण्याच्या गुणवत्तेचे महत्व का ?
पाण्यातील भौतिक, रासायनिक व जैविक घटकांची असलेली मात्रा म्हणजेच पाण्याची गुणवत्ता होय. पाणी हे वैश्विक द्रावक (Universal Solvant) आहे. पाण्यात जास्तीत जास्त घटक सामावून, विरघळवून घेण्याची क्षमता असते. भारतीय मानक संस्थेने पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत ठरवून दिलेल्या निकषांनुसार, एक किंवा अनेक घटक कमाल मर्यादेपेक्षा जास्त आढळून आल्यास आपण पाणी दूषित झाले असे समजतो. हे दूषित झालेले पाणी सजीवांच्या म्हणजेच, मानव व वनस्पतींच्या योग्य वाढीसाठी अपायकारक असते.
जलप्रदूषणाची कारणे काय ?
जलप्रदूषणाची प्रामुख्याने दोन कारणे आहेत. एक म्हणजे नैसर्गिक कारण, आपल्याला माहिती आहे की, पाण्याच्या एकमेव स्त्रोत पाऊस हा आहे. पाऊस पडताना पावसाचे पाण्यात, वातावरणातील विविध वायु, धुलीकण, धूर इत्यादी घटक मिसळले जातात. तसेच पाणी जमिनीवरून वाहतांना जमिनीवरील घटक मिसळले जातात. जमिनीवरील पाणी भूगर्भात झिरपताना, मातीतील व खडकांतील विविध प्रकारचे खनिजांमधील घटक मिसळले - विरघळले जातात.
मानवनिर्मित कारणे म्हणजे वाढती लोकसंख्या, औद्योगिकरण, वेगवेगळ्या प्रकारची वाढती कारखानदारी, शेतीकाम, अयोग्य सांडपाणी व्यवस्थापन इत्यादी कारणांमुळे पाण्याचे प्रदूषण घडून येते.
भारत हा शेती प्रधान देश आहे. शेतमालाची उत्पादता वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतेे, कीटकनाशके, तृणनाशके यांचा वापर होत असतो हे घटक पाण्यात विरघळून जल प्रदूषण होते.
दिवसेंदिवस भूगर्भातील पाण्याच्या उपलब्धतेसाठी अतिखोल विंधन विहीरी व विहीरी घेण्याकडे लोकांचा कल दिसून येत आहे. त्यामुळे भूजलाची पातळी खालावत चालली आहे. भूजलाची पातळी खालावल्यामुळे, अतिखोल जलधारक खडकातील घटकांचे भूजलातील प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.
Answer:
hey..stop this plz..
what do uh want???