शहरी भागात प्राथमिक व्यवसायाचे प्रमाण कमी का असते
Answers
Answer:
लोकसंख्येच्या अभ्यासात लोकसंख्येचे विविध घटक अभ्यासले जातात. लोकसंख्येच्या विविध घटकात लोकसंख्येचे वितरण, लोकसंख्येची घनता, साक्षरता वयरचनेनुसार लोकसंख्येचे वितरण आणि वर्गीकरण, लिंग रचनेनुसार लोकसंख्येचे वर्गीकरण, स्थलांतराची कारणे आणि स्थलांतराचा उद्देश. अशा विविध प्रकारे लोकसंख्येचा अभ्यास केला जातो.
अशाच प्रकारे लोकसंख्येचा अभ्यास हा लोकांच्या वास्तव्याच्या ठिकाणावरूनही केला जातो. लोकसंख्या वास्तव्याच्या ठिकाणावरून लोकसंख्येचे ग्रामीण लोकसंख्या आणि शहरी लोकसंख्या असे वर्गीकरण करता येते.
ग्रामीण आणि शहरी वसाहतीतील लोकसंख्येची काही विशेष वैशिष्ट्ये दिसून येतात.
लोकसंख्येचे राहणीमान, त्यांच्या व्यवसायाचे स्वरूप, सामाजिक रचना, वय रचना, लिंग गुणोत्तर, लोकसंख्येचे वितरण, लोकसंख्येच्या घनतेचे वितरण आणि विकासाचा स्तर या सर्व वैशिष्ट्यांबाबत ग्रामीण आणि शहरी लोकसंख्येत लक्षणीय फरक दिसून येतो.
सर्वसाधारणतः ग्रामीण लोकसंख्या ही प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायात गुंतलेली दिसते. येथे लोकसंख्येची एकूण घनता ही कमी असते. त्याच प्रमाणे आर्थिक विकासाचा स्तरही कमी असल्यामुळे पायाभूत सेवा सुविधा, वैदयकीय सेवा-सुविधा, शिक्षणाच्या सेवा-सुविधा या शहरी भागाच्या तुलनेत कमी विकसित असतात. बहुतांशी स्थलांतरितांच्या प्रकरणात ग्रामीण भाग हा स्थलांतरित देणारा प्रदेश असतो आणि ग्रामीण भागातून शहरी भागाकडे, विकसित भागाकडे स्थलांतर होत असते. याचा परिणाम ग्रामीण भागातील वय रचना आणि लिंग गुणोत्तरावर होताना दिसतो. अनेक वेळेस शेती आणि स्थानिक ग्रामीण उदयोगांना कार्यकुशल मजुरांची कमतरताही भासते.
या तुलनेत शहरी लोकसंख्या ही प्रामुख्याने द्वितीयक व तृतीयक व्यवसायांत कार्यरत असते. शहरी भाग हा स्थलांतरित घेणारा प्रदेश असतो. साहजिकच येथे लोकसंख्या आणि लोकसंख्येची घनता या दोन्ही बाबी जास्त असतात. स्थलांतरितांमध्ये प्रामुख्याने कार्यशील अशा १५ ते ५९ वयोगटातील लोकांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शहरांमध्ये लिंग गुणोत्तरही असमान असते आणि पुरुषांची संख्या ही स्त्रियांच्या संख्येच्या तुलनेत जास्त असते. शहरांमध्ये द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक व्यवसायांचा विकास झालेला असतो. पायाभूत सुविधा, वैद्यकीय सेवा सुविधा, शैक्षणिक सेवा-सुविधा या ग्रामीण प्रदेशांच्या तुलनेत चांगल्या प्रकारे उपलब्ध असतात. त्यामुळे एकंदरीत राहणीमानही चांगले असते. मात्र, काही प्रदेशात आणि काही शहरात जास्त लोकसंख्येमुळे आणि जास्त लोकसंख्या घनता यांमुळे निवासाच्या समस्या निर्माण होतात. घरांच्या किमती खूप जास्त असतात आणि त्यामुळे झोपडपट्टी निर्माण होतात.
थोडक्यात, वास्तव्याच्या ठिकाणावरून लोकसंख्येचे ग्रामीण आणि शहरी असे वितरण अभ्यासले, तर त्यात खूप लक्षणीय फरक दिसून येतात.
उत्तर:
प्राथमिक क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचे क्षेत्र आहे जे नैसर्गिक संसाधनांचा थेट वापर करते. त्यात कृषी, वनीकरण, मासेमारी आणि खाणकाम यांचाही समावेश होतो. याउलट, दुय्यम क्षेत्र वस्तूंचे उत्पादन करते आणि तृतीय श्रेणी सेवा प्रदान करते. प्राथमिक क्षेत्र हे सहसा कमी विकसित देशांमध्ये सर्वात महत्वाचे असते तर विकसित देशांमध्ये ते कमी महत्वाचे असते.
कच्च्या मालाचे पॅकिंग किंवा शुद्धीकरण करणारे उत्पादन उद्योग प्राथमिक क्षेत्राच्या जवळ मानले जातात.
व्याख्या:
विकसित देशांमध्ये, प्राथमिक क्षेत्र अधिक तांत्रिकदृष्ट्या प्रगत झाले आहे, उदाहरणार्थ शेतीचे यांत्रिकीकरण, गरीब देशांच्या तुलनेत हाताने उचलणे आणि ठेवणे. अधिक विकसित अर्थव्यवस्था उत्पादनाच्या प्राथमिक साधनांमध्ये अतिरिक्त भांडवल गुंतवू शकतात: उदाहरणार्थ, युनायटेड स्टेट्समध्ये, कॉर्न बेल्टमध्ये, कॉम्बाइन हार्वेस्टर कॉर्न फवारतात आणि फवारणी करणारे मोठ्या प्रमाणात कीटकनाशके, तणनाशके आणि बुरशीनाशके फवारतात. कमी भांडवल-केंद्रित तंत्राचा वापर करून जास्त उत्पादन देणे शक्य आहे. या तांत्रिक प्रगती आणि गुंतवणुकीमुळे प्राथमिक क्षेत्राला एक लहान कर्मचारी काम करण्याची परवानगी मिळते, म्हणून विकसित देश उच्च माध्यमिक आणि तृतीयक क्षेत्रांमध्ये सामील असलेल्या टक्केवारीऐवजी त्यांच्या कर्मचार्यांची एक लहान टक्केवारी प्राथमिक क्रियाकलापांमध्ये गुंतवतात.
know more information about it
https://brainly.in/question/52481386
know more information about it
https://brainly.in/question/44420642