शहरी मतदारांची अनास्था कारणे व उपाय
Answers
Answer:
येत्या जून महिन्यात पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका होणार आहेत. त्यातील एक मतदारसंघ मुंबई पदवीधर मतदारसंघ हा आहे. पदवीधरांचे प्रतिनिधी राज्याच्या वरिष्ठ सभागृहात जावेत, तेथे त्यांनी पदवीधरांचे प्रश्न मांडावेत यासाठी घटनाकारांनी केलेली ही तरतूद. मात्र पदवीधर मतदारसंघ म्हणजे काय? या मतदारसंघाचे महत्त्व काय? या मतदारसंघाच्या निवडणुका कशा होतात? आणि अधिकाधिक पदवीधर मतदारांनी या निवडणुकीसाठी मतदार नोंदणी करण्याची गरज का आहे? याबद्दल अगदी सुशिक्षितांनाही माहिती नसते. मुंबईसारख्या एरवी माहितीचा पूर येणाऱ्या शहरातही याबाबतीतले अज्ञान आणि उदासीनता लक्षणीय आहे. त्याचा परिणाम म्हणजे या मतदारसंघात होणारी नाममात्र मतदारनोंदणी आणि त्याहीपेक्षा तुरळक मतदान. या अनास्थेचा काहींना फायदा होत असला तरी सुशिक्षितांचा लोकशाही प्रक्रियेशी संबंध असावा असे आपल्याला वाटत असेल तर हे चित्र फारसे आशादायी नाही.
पदवीधर मतदारसंघामध्ये शिकल्या सवरलेल्या मंडळींचे मतदार म्हणून नोंदणी करण्याचे आणि प्रत्यक्षात मतदानासाठी बाहेर पडण्याचे प्रमाण अत्यल्प असते. या निवडणुका सहा वर्षांतून एकदा होतात. त्यांचे आणि इतर सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक जुळत नाही. या निवडणुकांसाठी निवडणुकांची अधिसूचना जाहीर झालेल्या तारखेआधी तीन वर्षे (यंदासाठी १ ऑक्टोबर २०१४) पदवीधर झालेला / झालेली कोणीही व्यक्ती मतदार म्हणून चालते.
HOPE THIS HELPS YOU
THANK YOU ❤