शहरामध्ये कोणकोणत्या
समरचा आढळातात
Answers
Answer:
वाढती लोकसंख्या ही भारताच्या विकासातील मोठा अडथळा आहे. या वाढत्या लोकसंख्येला सोयी-सुविधा पुरविण्यासाठी शहरपातळीवर कोणकोणत्या योजना राबवायला हव्यात, याविषयीचे विश्लेषण करतानाच दुसऱ्या बाजूला वाढत्या लोकसंख्येमुळे शहराचे कसे बकालीकरण होत आहे, यावर टाकलेली नजर.. ११ जुलै या जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त..वाढती लोकसंख्या ही भारताच्या विकासातील मोठा अडथळा आहे. या वाढत्या लोकसंख्येला सोयी-सुविधा पुरविण्यासाठी शहरपातळीवर कोणकोणत्या योजना राबवायला हव्यात, याविषयीचे विश्लेषण करतानाच दुसऱ्या बाजूला वाढत्या लोकसंख्येमुळे शहराचे कसे बकालीकरण होत आहे, यावर टाकलेली नजर.. ११ जुलै या जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त..
शहरीकरण म्हणजे शहराच्या लोकसंख्येची व त्याच्या क्षेत्राची वाढ. वाढते औद्योगिकीकरण व खेडय़ातून शहराकडे होणारे लोकांचे स्थलांतर यांचासुद्धा शहरीकरणामध्ये समावेश होतो. २०११ च्या जनगणनेनुसार ३०.१६ टक्के लोकसंख्या शहरामध्ये राहते. एका पाहणीनुसार २०३० पर्यंत जवळपास २५ कोटी अतिरिक्त लोकसंख्या शहरांमध्ये येणार आहे. असेही दिसून आले आहे, की शहरीकरण आणि विकास हे बरोबरीनेच चालतात. जी राज्ये झपाटय़ाने विकास करत आहेत त्यांचाच शहरीकरणाचा वेग अधिक आहे. २०१२-१३ सालच्या पाहणीनुसार महाराष्ट्राच्या शहरीकरणाची टक्केवारी ४५.२ % होती. ती २०३० पर्यंत ५८% होण्याची शक्यता आहे. भारतातील ३ मोठय़ा मेट्रो शहरांची लोकसंख्या जगातील काही देश जसे कॅनडा, मलेशिया, सौदी अरेबिया, ऑस्ट्रेलिया यांच्यापेक्षा मोठी होईल.
या सर्व वाढत्या लोकसंख्येचा आजच्या शहरांवर मोठय़ा प्रमाणात परिणाम होणार आहे. या सर्व परिणामांचा सूक्ष्मपणे विचार करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण शहरीकरण आणि त्याचा वेग यांना थोपवणे आता जवळपास दुरापास्त आहे आणि देशाच्या विकासाच्या दृष्टीने शहरीकरण आवश्यकसुद्धा आहे.
शहरीकरणाला चांगली बाजूही आहे. देशाचा आíथक विकास हा शहरीकरणावरही अवलंबून असतो. २०३० पर्यंत भारताचे ७०% स्थूल राष्ट्रीय उत्पन्न शहरातून येणार आहे. कारण देशाच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत औद्योगिकीकरण व सेवा क्षेत्रात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही हेच चित्र दिसतं. विकसित देशातील शहरीकरणाची टक्केवारी ही नेहमीच जास्त असते. अमेरिकेमध्ये शहरीकरणाचे प्रमाण ८० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. शहरीकरणामुळे शिक्षणाचा दर्जा सुधारतो. मोठय़ा प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतो. त्याचबरोबर आजूबाजूच्या खेडय़ांचासुद्धा विकास होत असतो.
परंतु विकासाबरोबरच शहरीकरणाची काळी बाजूसुद्धा ठळकपणे दिसून येते. शहरीकरणामुळे शहरातील सोयीसुविधांवर मोठय़ा प्रमाणावर ताण वाढतो व शहरी वातावरणाचा समतोल बिघडतो. काही शहरे वगळता सर्व शहरांमध्ये सध्याच्या लोकसंख्येला आवश्यक असलेला पाणी पुरवठा, मलनि:सारण व्यवस्था, वाहतूक व्यवस्था याची मोठय़ा प्रमाणावर कमतरता भासते. त्या पुरवतानाच स्थानिक संस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळेच वाढीव लोकसंख्येमुळे त्या सोयीसुविधांवर आणखीनच प्रचंड ताण पडणार आहे. या सर्व सुविधांची गरज २०३० पर्यंत कितीतरी पटीने वाढणार आहे. शहरांना भेडसावणारी मुख्य समस्या म्हणजे पाणीपुरवठा, ज्याची मागणी २.५ पटीने होणार आहे. आजच शहरातील जमा झालेल्या घन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य जागा व व्यवस्था उपलब्ध नाही. २०३० पर्यंत घन कचऱ्यामध्ये ५ पट वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा प्रश्न अधिकच बिकट होणार आहे. दुसरी समस्या म्हणजे रस्ते आणि वाहतूक. मोठय़ा शहरातील वाहतूक व्यवस्था घाईगर्दीच्या वेळेमध्ये नेहमीच कोलमडते. उदारीकरणामुळे सर्वसामान्यांची क्रयशक्ती मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे खाजगी वाहनांची संख्या दिवसेंदिवस मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे. आजच गर्दीच्या वेळी रस्त्यांवर वाहनांची रांगच रांग लागते. २०३० पर्यंत खाजगी वाहनांची संख्या जवळपास दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्येवर आतापासूनच विचार केला नाही तर भयानक परिस्थितीचा सामना करावा लागेल.
शहरातील बहुतांश लोकसंख्या ही लघू आणि मध्यम उत्पन्न गटातील असते. शहरातील गगनाला भिडणाऱ्या जमिनीच्या दराने तसेच बांधकामाच्या वाढीव खर्चामुळे त्यांना परवडणाऱ्या किमतींमध्ये घरं उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे त्यांना नाइलाजाने झोपडपट्टीचा आसरा घ्यावा लागतो. आज मुंबईतील ६०% जनता झोपडपट्टीमध्ये राहते. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांची आजची परिस्थिती पाहिली की कुणाही सुजाण नागरिकाची मान लाजेने खाली जाते. २०३० मध्ये परवडणाऱ्या घरांची मागणी ३.८ कोटींवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे झोपडपट्टय़ांमध्ये वाढ होतच राहणार.
शहरीकरणाचा परिणाम पर्यावरणावरही मोठय़ा प्रमाणावर होत असतो. शहरीकरणासाठी मोठय़ा प्रमाणावर वृक्षतोड होत असते. कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरीही पर्यावरण संवेदनशील क्षेत्रामध्ये अनधिकृत बांधकाम होतच असते. त्यामुळेच पर्यावरणाचा समतोल बिघडतो. समुद्राची पातळी वाढत आहे, डोंगरांचा ऱ्हास होतोय. नुकत्याच झालेल्या उत्तरकाशीतील जलप्रलयालासुद्धा अनियंत्रित बांधकाम जबाबदार आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. काँक्रीट, अस्फाल्ट, विटा यासारखे साहित्य उष्णता शोषून घेतात त्यामुळे शहरातील हवा रात्रीसुद्धा गरम असते. शहरातील वेगवेगळ्या घडामोडींमुळे वातावरणात वेगवेगळे विषारी द्रव्य उत्सर्जति केले जातात. जसे कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड यांचे प्रमाण खूप वाढत चालले आहे. त्यामुळेच शहरात श्वास घ्यायला शुद्ध हवा मिळत नाही. यात दुचाकी आणि चारचाकी यातून उत्सर्जति होणाऱ्या धुराचा मोठा वाटा आहे. वाढत्या विकासकामामुळे नसíगक नाले, तलाव मोठय़ा प्रमाणावर बुजवले जात आहेत. त्यामुळे पर्यावरणावर आणि जैवविविधतेवर विपरीत परिणाम होत आहेत. शहरातील जमिनीतील भूजलाची पातळी घटली आहे
Answer:
Bharath me anak basha he aur bhi bhi accha he is liye muje thanks kaho