Shahu maharaj museum kolhapur information in marathi
Answers
Answer:
छत्रपती शाहू महाराज वस्तूसंग्रहालय कोल्हापूर शहरातील एक प्रसिद्ध पर्यटक आकर्षण आहे.१८७७-१८८४ दरम्यान हे वस्तूसंग्रहालय बांधले गेले होते. या वस्तूसंग्रहालयात विविध प्रकारचे चित्र, कलाकृती आणि शिल्पाकृती पाहायला मिळतात.या वस्तूसंग्रहालयात चित्र आणि कलाकृती पाहून आपल्याला त्या काळाच्या शाही जीवनशैलीची माहिती मिळते.
या वस्तूसंग्रहालयाच्या भोवती सुंदर बाग आणि प्राणीसंग्रहालयासुद्धा आहे.या प्राणीसंग्रहालयामध्ये विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतात.वस्तूसंग्रहालयात एक भव्य दरबार दिवाणखाना आहे.राजा-महाराजांनी वापरलेले दागिने,शस्त्रे,पोशाख,नाणी आणि औरंगजेबची एक तलवार या वस्तूसंग्रहालयात पाहायला मिळते.भारताच्या राज्यपाल आणि ब्रिटिश व्हाइसरॉयकडून आलेले पत्र इथे ठेवलेले आहे.बरेच विदेशी आणि देशी पर्यटक दरवर्षी या वस्तूसंग्रहालयाला भेट देतात.
Explanation: