shaleche manogat nibandh
Answers
Answer:
following is nibandh
Explanation:
नुकत्याच सुट्ट्या संपून शाळा भरली. सर्व मुले एकमेकांना सुट्टीमधील गमतीजमती सांगण्यात मग्न झाले होते.
सगळ्यांना आनंद झाला होता आणि सगळ्यांसोबत मलाही आनंद झाला होता.
मी शाळा बोलतीये. माझे नाव … आहे.
खूप दिवस माझे वर्ग बंद होते. शाळेला सुट्टी असल्यामुळे मुलांचा गोंधळ नाही, शिक्षकांचे अमूल्य मार्गदर्शन ऐकायला मिळाले नाही, प्रार्थना नाही पूर्ण शांतता.
परंतु आता मात्र मी पूर्ण भरभरून गेले आहे. प्रार्थना ऐकून माझ्यात उत्साह निर्माण होतो.
शाळेत आल्यावर दंगा, मस्ती करणारी लहान मुले जेव्हा प्रार्थनेसाठी एकदम शिस्तीचे पालन करून प्रार्थना म्हणतात हे पाहून खूप छान वाटते.
तुमच्या अभ्यासाच्या वेळेतून तुम्ही माझ्यासाठी थोडासा वेळ काढून माझ्या अंगणातील स्वच्छता करून माझी निगा राखता हे तर माझ्यासाठी न विसरणारी गोष्ट आहे.
कचरा होऊ नये म्हणून माझ्या प्रत्येक कक्षेत कचरा पेटीचे केलेले नियोजन खूप छान आहे.
वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तुम्ही यश मिळवून माझ्या काक्ष्यांमधून तसेच माझ्या परिसरामधून आनंदाने मिरवता तेव्हा मलाही तुमच्याबद्दल अभिमान वाटतो