Social Sciences, asked by mohitgayakwad103, 3 months ago

sharirik shiktionacha varsa ha chalt alela aahe

Answers

Answered by XxitsmrseenuxX
1

Answer:

मुलामुलींच्या शारीरिक, बौद्धिक, भावनिक व सामाजिक विकासासाठी आनंददायी, गतिमान व क्षमतावर्धक अशा शारीरिक हालचालींद्वारे नियोजनपूर्वक दिले जाणारे शिक्षक. हालचाल हा शारीरिक शिक्षणाचा पाया असून शरीर हे शारीरिक शिक्षण प्राप्त करण्याचे प्रमुख माध्यम आहे. असे असले, तरी शारीरिक शिक्षणाचे उद्दिष्ट केवळ शरीरापुरतेच मर्यादित नाही; तर शरीराबरेबरच मन, भावना, विचार इत्यादींवर होणारे संस्कारसुद्धा त्यात अंतर्भूत आहेत.

विविध शारीरिक हालचालींद्वारे व्यक्तीला मिळणाऱ्या अनुभवाचे संघटित ज्ञान म्हणजे शारीरिक शिक्षण, अशी व्याख्या डी. ओबर्ट्युफर यांनी केली आहे. शारीरिक शिक्षण हा एका मोठ्या समग्र अशा विषयाचा एक भाग असून त्याचा संबंध महत्त्वाच्या स्नायूंच्या हालचालींशी आणि त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या क्रियांशी आहे. अशी व्याख्या डॉ. जे. बी. नॅश यांनी केली आहे. 'महत्त्वाच्या स्नायु-हालचालींमधून मिळणाऱ्या परिपूर्ण अनुभवाद्वारे बालकाची सर्वाधिक अंतिम टप्प्यापर्यंतची वाढ व विकास साधणाऱ्या प्रक्रिया -समुच्चयास शारीरिक शिक्षण असे म्हणतात', अशी कल्पना ब्राउनेल यांनी मांडलेली आहे. 'शारीरिक हालचालींद्वारे शरीर, मन व आत्मा यांचा परिपूर्ण व योग्य विकास साधून बालकाच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधणे, म्हणजे शारीरिक शिक्षण होय', अशी व्याख्या भारताच्या केंद्रीय शारीरिक शिक्षण व मनोरंजन सल्लागार मंडळाने केलेली आहे.

शारीरिक शिक्षणाची उद्दिष्टे

शारीरिक शिक्षण व मनोरंजनाच्या आराखड्यामध्ये शारीरिक शिक्षणाची पुढील उद्दिष्टे निश्चित केलेली आहेत :

(१) कार्यक्षमतेचा विकास : इंद्रियविकास आणि शरीराची सुदृढता यांवर शरीराची कार्यक्षमता अवलंबून असते. इंद्रियांचा विकास कृतिपूर्ण परिश्रमातून होतो आणि त्यासाठी लहानपणापासून होणाऱ्या हालचाली कारणीभूत ठरतात. इंद्रियांना पोषक ठरणाऱ्या व त्यांची कार्यक्षमता वाढवणाऱ्या हालचाली शिकवणे, हे शारीरिक शिक्षणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट.

(२) मज्जासंस्था व स्नायुसंस्था यांतील सहकार्यात्मक विकास : शारीरिक क्रियांचे कौशल्य वाढवणे, हे शारीरिक शिक्षणाचे दुसरे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. लहान मुलांच्या सर्व नैसर्गिक हालचाली प्रयत्नाने आणि सरावाने हळुहळू सफाईदार होत जातात. चालणे, धावणे, उड्या मारणे, फेकणे, झेलणे, शरीराचा तोल सांभाळणे या मूलभूत क्रिया सहजपणे व कौशल्यपूर्ण होणे आवश्यक असते. लहान वयातच मुलांना योग्य मार्गदर्शन केल्यास त्यांच्या स्नायू व मज्जासंस्था यांतील सहसंबंध सुधारून वरील मूलभूत क्रिया कौशल्यपूर्ण होऊ शकतात.

(३) व्यक्तिमत्त्वाचा विकास : व्यक्तीचा शारीरिक, बौद्धिक, भावनिक, सामाजिक विकास साधून तिच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगिण विकास करणे. हे शारीरिक शिक्षणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. व्यक्तीचा बांधा, शारीरिक शिक्षणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. व्यक्तीचा बांधा, शारीरिक ठेवण, वर्तन विशेष, अभिरुची, अभिवृत्ती, कर्तृत्व आणि कला-गुण यांचा वैशिष्ट्यपूर्ण संघात म्हणजे व्यक्तिमत्त्व होय. यांतील अनेक घटकांचा विकास शारीरिक शिक्षणाने साधला जातो.

Similar questions