India Languages, asked by ashish9373246316, 11 months ago

Shetkari Khara andata nibandh ​

Answers

Answered by halamadrid
1

■■"शेतकरी - आपला खरा अन्नदाता"■■

शेतकरी हा आपल्या सगळ्यांचाच "अन्नदाता" आहे.शेतकरी महत्वाचे काम म्हणजेच अन्न पिकवण्याचे काम करतो.शेतकऱ्याचे काम खूप काष्टाचे असते.तो दिवस रात्र शेतात राबून आपल्यासाठी अन्न पिकवत असतो.

इतकी मेहनत करून सुद्धा त्याला कधीकधी त्याच्या कष्टाचे फळ मिळत नाही. कमी किंवा जास्त पावसामुळे शेतात पिकवलेल्या धान्याची नासाडी होते. शेतकऱ्याला कधीकधी पैशांच्या गरजेपायी कमी पैशांमाध्ये आपले पीक विकावे लागते.

काही शेतकरी कर्ज न फेडू शकल्यामुळे आत्महत्या करतात.अशा प्रकारे, शेतकऱ्यांचे जीवन खूप कष्टदायी असते. इतके कष्टदायी जीवन असून सुद्धा शेतकरी त्याचे काम ईमानदारी व मेहनतीने करत असतो. तो त्याच्या कामाचा कंटाळा करत नाही.

म्हणून शेतकऱ्याचे सन्मान केले पाहिजे. त्याने पिकवलेल्या अन्नाचे सुद्धा आदर केले पाहिजे व अन्न वाया नाही घालवले पाहिजे.

Similar questions