India Languages, asked by tanmaib9952, 1 year ago

"Shetkarya che aatmavrutt " nibandha in marathi

Answers

Answered by arjun6068
7
शेतकर्याचे आत्मवृत्त

सकाळीच सावकाराची माणस चांदीलाओढत घेउन गेली. चार अजाण पोर, एकखपाटीला गेलेल म्हातर पोट आणिहातावर हात धरुन बसण्याखेरिज काहिचकरु न शकणारे आम्ही दोघ. चांदीलासगळ्यांची काळजी. एकच दुभती गाय, पण ती ही आज नेली.

पाच वर्ष झाली, बियाण आणायलाहिहातात रक्कम शिल्लक नव्हती आणिसावकाराची पायरी चढावी लागली. तसामाझा फाटका  संसार, ठिगळ जोडायलासावकाराच तोंड बघावच लागत. पणयावेळी निकड जरा जास्त होती. आंगठालाउन पैसे उचलले, अजुन हिशोब मिटतनाही. व्याजाची रक्कमच फिटली नाहीअजूनही. आता आम्ही अडाणी, आकडेमोड जमणार कशी. दोन वेळचपोटात ढकलायला काहि शिल्लक नाही. अक्षर गिरवायची हौस परवडणार कशी.

पोर समजुतदार मोठी धाकट्यान्नासांभाळतात. त्यांच्या आईला चुलीवर मदतकरतात. पण शिक्षण हव. आमच्यासारखीगुलामगिरी नको.

आमच बेभरवशाच जगण. आजानी खपुनजमिनीचा तुकडा घेतला. त्यावर जेमतेमभागायच, पण जमिन आपली होती. पुढेबापाचे हात राबराब राबले पण नशिबाचीसाथ नाही. तीन वर्ष दुष्काळानी पाण्याचाथेंब बघु दिला नाही. शेवटी डोळ्यातलीआसव ही संपली. होती-नव्हती जमीनगेली. आता दिवसाच्या मजुरीवर पोट.

सरकारची लोक वर्षातुन एकदा येतात. एखादा हंडा, एखाद लुगड हातात पडतआणि भरिला ढिगभर नुसती स्वप्न. तरीइमान सोडल नाही. या मातीतला जन्मआमचा, तिचीच सेवा घडावी. हे सोडुनशहरात काम शोधायला गेलो नाही.

आज ना उद्या पाझर फुटेल नशिबाला. पोरआताशा अंगणवाडीत जातात. एक ताईसमाजसेवा म्हणुन लेकरान्ना शिकवते. दोनमुठ तांदुळ तिला नेउन देतो. अशी देवमाणस जगायला हवी.

यंदाच्या वर्षीचा दुष्काळ खूप भीषण. आठवर्षापूर्वी परत मिळवलेला जमिनीचातुकडा पावसाची वाट बघुन थकला. बाजुच्या शेतावर मजुरीच काम मिळेना. कधी कधी  जीव नकोसा होतो.  परवाखुंटीवरचा दोर उचलुन झाडावर बांधुनआलो. पण हे हात हरले तर मग तुमचीपोट भरणार कशी? हे, त्याच वेळी मनातआल आणि पाय माघारी फिरले तेकायमचे. आता  भविष्य आणखी कितीहीभेगाळल तरी हे हात राबतील. तुमच्यातोंडात घास द्यायचा वसा असाच चालूराहिल.

"दोन हातानी, विश्वाला रांधायची होती भूक

पोर तरिही रहातील उपाशी हीच रुखरुख"

प्रसन्न तुलाच भूमाता 

पांग फेडिलेस सर्वार्था 

प्राणीमात्रांचा कैवारी तू 

तूच अमुचा अन्नदाता

सुखे पेरलिस आसवे 

मोत्यांचे फुलतील ताटवे 

घन आनंदच बरसतील 

दु:स्वप्न संपु दे आता 

प्राणीमात्रांचा कैवारी तू 

तूच अमुचा अन्नदाता

 ...

......भावना
___________
OR
_________
आजतरी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दररोज चातकासारखी वाट बघावी लागते. शेतकऱ्याचा जन्मच मुळी अन्नदानाचं काम करण्यासाठी झालाय. त्याचं किती भागतं माहित नाही. एकतर जमीन ही अशी कोरडवाहू आणि निसर्ग म्हणजे आमचा ...

सर्व मजकूर पहा



_______
OR
___

मला खूप जगायचं असं म्हणता म्हणता
मी आत्महत्या केली .
कधी पूर तर कधी दुष्काळ
अवकाळी पावसानं पिकं नासून गेली .
पोरास्नी लय शिकवायचंय , मोठ्ठ करायचं
स्वप्नं म्या सुंदर पहायली  
पण दोन येळची पोटाची खळगी भरताना
नाकीनऊ आली . मला खूप जगायचं अस म्हणता म्हणता
मी आत्महत्या केली .
पालन पोषण न्हाय केलं म्हणून
धरणी माय कावली
पेरलं बी तरी बी नाही पण रोपं उगवली .
सरकारची पोकळ आश्वासनं सारी
दुष्काळावाणी करपून गेली .
जगू कसा मी जगू कसा , अशी दैना माझी झाली
विश घेऊन मारायला बी
दोन चार पैक न्हाई शिल्लक उरली .
व्हीरीत उडी घेऊन मंग म्या बी आत्महत्या केली .
तरी जीव घुटमळतोय अजून
भूत बनून फिरतेय साउली
मरून बी देवानं मला दया नाय दावली .
मला खूप जगायचंय असं म्हणता म्हणता
मी आत्महत्या केली.....

tanmaib9952: Thanks bro
arjun6068: wclm sister ☺☺
Answered by pranav358
6
संस्कृती सुरू झाल्यापासून शेतकरी हा सर्वात उपयुक्त लोक आहे. आम्ही आमची अन्नपदार्थाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी शेतीवर अवलंबून असतो. आम्ही आमचे अन्न मिळवितो कारण शेतकरी पिके वाढवतो आणि शेतीची कामे करतो. तरीदेखील, ते संपूर्ण मानवतेचे पोषण करतात, त्यांच्या जीवनाची स्थिती समाधानकारक नसून

शेतकऱ्याचे जीवन अतिशय कठीण असते. तो सर्व ऋतू मध्ये दिवस आणि रात्र फार कठीण काम करतो. उन्हाळ्यात ते सूर्यप्रकाशाच्या उष्णतेखाली काम करतात हिवाळ्याच्या मोसमात शेतात नांगरणी करताना तो ओले होतो. हिवाळा दरम्यान, तो कंटाळवाणा आणि थंड हवामान असूनही आपल्या कष्टाची काम करतो.

शेतकऱ्याचे आयुष्य निसर्गाच्या शक्तीवर अवलंबून असते. शेतीसाठी, पुरेसा मान्सून आवश्यक आहे. जर पाऊस पुरेसा असेल तर कृषी उत्पादन चांगले राहील.

तथापि, अपुरा पाऊस आणि पाण्याच्या टंचाईचा दीर्घकालीन परिणाम होऊन दुष्काळ परिस्थिती निर्माण होऊ शकते. परिणामी, शेतीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि दुष्काळाकडे जाणारा अन्नधान्याचा तुटवडा असू शकतो.

बहुतेक शेतकरी साधे, कठोर परिश्रम, प्रामाणिक व प्रामाणिक लोक आहेत. ते नेहमी स्वभाव आणि देव यांच्या दयाळूपणामध्ये राहतात.

शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने अनेक योजना सुरु केल्या आहेत. अशी आशा करूया की हे फायदे प्रत्यक्षात शेतकर्यांना पोहचतील.


tanmaib9952: Thanks re aghav pora
pranav358: w.c
tanmaib9952: hmm
Similar questions