shetkaryache manogat marathi nibhanda
Answers
Explanation:
आहे एक छोटा शेतकरी. महाराष्ट्रातील मराठवाड्यातील एका आडगावात माझी थोडी जमीन आहे. फारशी सुपीक नाही; पण नापीकही नाही. या जमिनीवरच आजवरच्या आमच्या पिढ्या पोसल्या गेल्या आहेत. या जमिनीवर माझे जिवापाड प्रेम आहे; पण या प्रेमानं काय भागणार?
पीक अवलंबून असत ते त्या लहरी राजावर, म्हणजे आपल्या पावसावर! आमच्या गावाच्या जवळपास मोठी नदी नाही. लहानसहान नद्यांना पाणी असते, पण तेही पावसावर अवलंबून, उन्हाळ्यात त्यापण आटून जातात. त्यामुळे मृगाचं नक्षत्र आलं की, आम्हां शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागतात.
कुठे दिसतोय का आमचा काळा विठोबा! म्हणजे काळा ढग हो! शेतं नागरून ठेवायची, कार्टकुटं काढायचं, ढेकळे फोडायची आणि पावसाची वाट बघत राहायचं. अंग उन्हात नुसतं भाजून निघायचं, पण पाण्याचा पत्ताच नाही. चार-चार, पाच-पाच कोसांवरून बाया पिण्यासाठी पाणी आणतात.
मग कधीतरी अवचित मळभ येतं, अंग गदगदून निघतं. सोसाट्याचं वारं सुटतं. इतक्यात पावसाचे थेंब टपयप गळू लागतात. क्वचित कधीतरी गारा पडतात आणि गारांनी अंगण भरून जातं. लहानमोठी, म्हातारीकोतारी त्या पावसात न्हाऊन निघतात. पावसात फक्त शरीरंच भिजतात, असं नाही; तर मनही निवतात.
आता शेतीला लागायला हवं. भिजलेल्या जमिनीत बी-बियाणं टाकायला हवं. पाऊसराजाने अशी कृपा केली की रोपं तरारून येतात. पण सगळं काही अवलंबून असते ते त्या पावसावर. तेवढ्यात येईल ते पीक, मिळतील ते दाणे. त्यावर सगळे वर्ष काढायचं, हेच आम्हां कोरडवाहू शेतकऱ्यांचं नशीब! पोळा झाला की पाऊस सरला.
उरलेल्या आठ महिन्यांत दुसरं पीक घेता येत नाही. कमी पाण्यावरची नाचणी, वरईसारखी पिकं घ्यावी लागतात. त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्याच्या नशिबी कायमचं दारिद्रय! कायमची उपासमार! काय करणार? मग बँकेतून कर्ज घ्यावे लागते. मग ते फेडता फेडता अर्धा जीव जातो.
आमच्या गावापासून थोड्या अंतरावरून मांजरी नदी वाहत आहे. इकडच्या भागातील नद्घांमध्ये ती बऱ्यापैकी मोठी आहे. या नदीवर धरण बांधलं आणि कालव्यांच्या मदतीने तिचं पाणी आमच्या गावात खेळवलं तर गावचा किती फायदा होईल! आम्ही पण दोन पिकं काढू शकू, बागायत करू शकू; पण हे आमचं मनोगत कधी पुरं होणार? परमेश्वरच जाणे! ..
यूट्यूब व्हिडिओ –
Answer:
l hope it is
useful
Explanation:
l hope it is
useful