India Languages, asked by seemagarg7077, 10 months ago

shikshak sampavar gele tar in marath

Answers

Answered by topanswers
10

शिक्षक संपावर गेले तर

शिक्षक संपावर गेले तर …. या नुसत्या कल्पनेनेच  मुलांना अत्यानंद होतो. पण खरंच जर असं झालं तर ???

सगळ्याच विद्यार्थ्यांना सुरुवातीचे काही दिवस खूप आनंद  होईल. शाळेत गेल्यावर ओरडायला कोणी नसेल. शाळेत जाऊन वर्गात बसायची सक्ती नसेल. कोणालाही कुठेही बसायची फिरायची सोय असेल. मधल्या सुट्टीत कितीही हुल्लडबाजी केली तरी तिथे येऊन टोकणारं कोणीही नसेल. गृहपाठ करणे, पाढे आणि कविता पाठ करणे, गणिताची  समीकरणं सोडवणे, विज्ञानाचे तक्ते बनवणे इ. कामांचा तगादा मागे नसेल. शाळेतून घरी कधीही जाता येईल. एवढंच नाही तर शाळेत गैरहजर राहिले तरी कोणी तुम्हाला कारणं विचारणार नाही. हे सगळे फायदेच होतील.

पण खरंच असं झालं तर???

मग परीक्षाही होणार नाहीत.  मुलं पुढच्या इयत्तेत जाऊ शकणार नाहीत. शिक्षकच नसतील तर अभ्यासही होणार नाही. मुलं शिकू शकणार नाहीत. शिक्षक शिस्त लावतात म्हणून शालेय जीवन अर्थपूर्ण आहे. त्यांनी घालून दिलेले नियम पाळण्यामुळेच तर आत्तापर्यंत विद्यार्थ्यांची प्रगती झाली. त्यामुळे शिक्षक संपावर गेले तर शिक्षकांचा किती फायदा होईल ते सांगणं कठीण आहे पण विद्यार्थ्यांचा तोटा होईल हे नक्की!!!!

Similar questions