Shikshanache mahatva
Answers
Explanation:
आज शिक्षणाचा बाजार झालेला आपण पाहतो. एका बाजूला वाढत जाणारा शिक्षणाचा खर्च आणि दुसर्या बाजूला घसरत चाललेला शिक्षणाचा दर्जा अशी विचित्र स्थिती आज निर्माण झाली आहे. गरीब- श्रीमंतांतील दरी वाढते आहे. त्यामुळे आज सक्तीचा शिक्षण कायदा अस्तित्वात असूनही शाळाबाह्य मुलांचा प्रश्न आहेच. शिक्षणाचे महत्त्व काय, हे आपल्या कृतीतून सार्या जगाला दाखवून देणार्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त, आज त्यांचे शैक्षणिक कार्यकर्तृत्व जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करूया.
डॉ. भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडित, राजनीतिज्ञ, लेखक, समाजसुधारक, तत्त्वज्ञ, भारतीय संविधानाचे शिल्पकार, मानवी हक्कांचे कैवारी, स्वतंत्र्य भारताचे प्रथम कायदा मंत्री होते. याशिवाय बहुआयामी व बहुश्रुत व्यक्तिमत्त्व असलेले डॉ. आंबेडकर हे समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, प्राध्यापक, बॅरिस्टर, वक्ते, पत्रकार, जलतज्ज्ञ, संपादक, स्वातंत्र्यसेनानी, संसदपटू, स्त्रियांच्या हक्कांचे कैवारी, मजूरमंत्री आणि भारत देशातील कोट्यवधी शोषित पददलितांचे उद्धारक सुद्धा होते.
देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, कायदा, शैक्षणिक, सांस्कृतिक, विद्युत, जल, कृषी, स्त्रीउद्धार, कामगार, शेतकरी, औद्योगिकीकरण, दलितोद्धार अशा अनेक क्षेत्रात अतुलनीय योगदानामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आधुनिक भारताचे जनक असे संबोधिले जाते. सर्वात महान भारतीय या भारताच्या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात स्वातंत्र्यानंतर सर्वात महान भारतीय म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विजयी घोषित झालेले आहेत. कोलंबिया विद्यापीठाने जगातल्या शीर्ष 100 विद्वानांची यादी तयार तयार केली, त्यात त्यांनी प्रथम स्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव ठेवून जगातले नंबर एक महाविद्वान म्हणून त्यांचा गौरव केला. इंग्लंडच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठाने गेल्या 10 हजार वर्षांमधील जगातल्या सर्वांत प्रभावशाली 100 विश्वमानवांची यादी प्रकाशित केली, त्यात चौथ्या स्थानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर प्रथम स्थानावर बुद्धांचे नाव होते. प्रचंड कुशाग्र बुद्धिमत्ता, प्रगाढ विद्वता, तल्लख स्मरणशक्ती असलेले बहुआयामी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ज्ञानक्षेत्रातील तब्बल 64 विषयांवर प्रभुत्व होते. एवढ्या विषयांवर प्रभुत्व असणारे जगाच्या इतिहासातील ते एकमेव व्यक्ती आहेत, असे इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठाने संशोधनातून मांडले. या विद्यापीठाने त्यांना जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती म्हणून घोषित केले आहे. देशसेवेसाठी दिलेल्या योगदानामुळे 1990 साली भारत सरकारने त्यांना भारतरत्न या भारतातील
सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविले. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातीलच नव्हे, तर जगातील कोट्यवधी शोषित, पीडित, क्रांतिकारी व मानवतावादी लोकांचे प्रेरणास्थान झालेले आहेत.
शिक्षणाची गरज त्यांनी प्रतिपादन केली. शाळेत मुलांना केवळ बाराखडी शिकवू नये तर मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तामय बनवावीत. समाजहितार्थ या ज्ञानप्राप्त मुलांनी आपली सामाजिक बांधीलकीची कर्तव्ये योग्य व समर्थपणे पार पाडावीत, असे शिक्षण असावे. शाळा म्हणजे उत्तम नागरिक व कर्तव्यदक्ष नागरिक बनविणारे कारखाने आहेत, याचे भान या प्रक्रियेत भाग घेणार्यांना असावे, असे त्यांचे मत होते.
Sharing is caring!