shikshanache mahatva essay in marathi
Answers
Answer:
प्रस्तावना:
मानवाचा सर्वागीण विकास हा शिक्षणावरच अवलंबून आहे. तसेच माणूस आणि पशु या दोघांमधील अंतर ओळखायचे साधन म्हणजे शिक्षण होय. प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि चांगले यश मिळवण्यासाठी चांगले शिक्षण घेणे आवश्यक आहे.
शिक्षण हे आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढविण्यास आणि आपले व्यक्तिमत्व घडविण्यास सहायता करते. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात शिक्षणाची मोठी भूमिका असते.
शिक्षण म्हणजे –
शिक्षण म्हणजे पुस्तके वाचली, परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झालो असे नव्हे. तर शिक्षण म्हणजे माणसाच्या जन्मापासून मरणापर्यंत चाललेली शिकायची प्रक्रिया आहे.
घर शिक्षणाचे पहिले साधन
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात घर हे शिक्षणाचे पहिले स्थान असते. प्रत्येक मुलाच्या जीवनात आई – वडील हेच त्याचे सर्वात प्रथम शिक्षक असतात. ते आपल्या मुलांवर चांगले संस्कार देऊन त्यांना घडवतात.
त्यानंतर ते आपल्या मुलांना शाळेत पाठवून शिक्षक त्यांना एक चांगल्या प्रकारचे वळण देतात आणि देशाचा एक चांगला नागरिक घडविण्याचे कार्य करतात.
शिक्षणाचा पाया
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा पाया हा शाळेतच रचला जातो. शाळेत प्राप्त झालेले शिक्षण, संस्कार आणि मूल्यांच्या आधारावरच पुढील शिक्षणातील यश हे अवलंबून असते. त्याच बरोबर शाळेमध्ये मिळणाऱ्या शिक्षणावरच देशाचे भवितव्य अवलंबून असते.
शिक्षणाच्या पायऱ्या
प्रत्येकाच्या जीवनात शिक्षण हे खूप महत्वाचे असते. प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण असे शिक्षण प्रणालीचे तीन भाग आहेत. शिक्षणाच्या सर्व स्तरांना विशेष महत्त्व आणि स्थान आहे.
प्राथमिक शिक्षण हे विद्यार्थ्यांसाठी पायाभूत सुविधा प्रदान करते, जे संपूर्ण जीवनभर मदत करते. माध्यमिक शिक्षण हे भविष्यात आयुष्याचा मार्ग तयार करते.