shilar gharanyachi mahiti
Answers
Answer:
एक मध्ययुगीन राजघराणे. शिलाहारांची तीन घराणी पश्चिम महाराष्ट्रात उदयास आली. एक, उत्तर कोकणात ठाणे व कुलाबा ह्या जिल्ह्यांवर राज्य करीत होते. त्यात १,४०० गावांचा समावेश होता, अशी सांप्रदायिक समजूत होती. या घराण्याला उत्तर कोकणचे शिलाहार म्हणतात. त्यांची राजधानी पुरी (सध्याची कुलाबा जिल्ह्यातील राजपुरी किंवा दंडा राजपुरी) येथे होती. अरबी समुद्रावर या घराण्याचे वर्चस्व होते. त्यातील काहींनी ‘पश्चिम समुद्र चक्रवर्ती’ ही पदवी धारण केली होती.
शिलाहारांचे दुसरे घराणे दक्षिण कोकणात (याला सप्तकोकण म्हणत) राज्य करीत होते. त्यांची राजधानी बलिपत्तन (सध्याचे रत्नागिरी जिल्ह्यातील खारेपाटण) येथे होती.
शिलाहारांचे तिसरे घराणे कोल्हापूर, सातारा, सांगली व बेळगाव ह्या जिल्ह्यांचा काही भाग ह्या प्रदेशांवर राज्य करीत होते. त्यांची राजधानी वळिवाड येथे होती. हे कोल्हापूच्या नैर्ऋत्येस सु. ४८ किमी. वर असलेले वळवडे असावे, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. त्याचे आता राधानगरीत रूपांतर झाले आहे. काही जुन्या लेखांत कोल्हापूर आणि प्रणालक (पन्हाळा किल्ला) यांचाही राजधानी म्हणून उल्लेख येतो, तर काहींच्या मते कोल्हापूरच्या पूर्वेकडील वळिवडे हे विद्यमान खेडे त्यांच्या राजशिबिराचे स्थान असण्याची शक्यता आहे.