Shivaji maharaj nibandh Marathi : शिवाजी महाराज निबंध मराठी
Answers
महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिव, शिवराय, शिवा अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजीचा जन्मदिवस हा ‘शिवजयंती’ म्हणून साजरा होतो. शिवाजी आणि त्यांचा पुत्र संभाजी यांचा संयुक्त उल्लेख शिवशंभू असा होतो. शिवाजीच्या कारकीर्दीला शिवकाल असेही म्हणतात.
शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजीने एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.
शिवाजी महाराज हे एक मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० साली फाल्गुन कृष्ण तृतीयेला शिवनेरी गडावर झाला. त्यांची आई जिजाबाई व वडील शहाजीराजे होते. लहानपणापासुन त्यांना आईने पराक्रमासाठी शस्त्रांचे शिक्षण दिले. शिवाजी हे एक हुशार व शुर राजा होतेच पण ते एक आदर्श सुपुत्र होते. १९६४ मध्ये त्यांचा राज्याभिषेक झाला. शिवाजी महाराजांनी अनेक लढाय्या जिकुन घेतले. त्यांनी लढाईच्या वेळी गनिमी कावा तंत्राचा चातुर्याने वापर केला. ते धर्मनिर्पेक्ष आणि दुरद्रुष्टी असणारे योध्दा होते. त्यांनी राजभाषा विकसित करण्याचा प्रयत्न केला. तसेच जनतेच्या मनात स्वाभिमान, पराक्रम, देश निष्ठा जागृत केली.