History, asked by mahadevshinde77777, 1 year ago

Shivaji maharajanchi sheti Vishay dhoran ​

Answers

Answered by Anonymous
2

Answer

महाराष्ट्राचं आद्य दैवत मानल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज, बहुजनांना मानाचं स्थान मिळवून देणारे छत्रपती शाहू महाराज, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हरितक्रांतीचे जनक आणि ज्यांची आज जयंती आहे ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राला खूप मोलाचं योगदान दिलं आहे. त्यांनी राज्यातील कृषी क्षेत्राची पायाभरणी केली. शेतकऱ्यांना समजात मानाचं स्थान मिळवून दिलं. ज्याचे चांगले परिणाम आज दिसत आहे.

 

छत्रपती शिवरायांचं कृषी धोरण

जाणता राजा..कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा राजा...म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज..शिवाजी महाराजांची शेती आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक धोरणं राबवली, राज्यात जलसंधारणाची अनेक कामं केली. त्याकाळी त्याचे शेती विषयीचे विचार हे आजच्या काळातही विचार करायला लावणारे आहे.

 

छत्रपती शिवाजी महाराज प्रभावळी मामल्याच्या सुभेदार रामजी अनंत याला 5 सप्टेंबर 1676 ला पाठवलेल्या पत्रात म्हणतात. -

 

" इमाने इतबारे स्वामीकार्य करावं अशी तू शपथ वाहिली आहेस, त्यानुसार भाजीच्या एका देठावरही मन न दाखविता रास्तपणे व योग्यपणे वागावे. रयतेचा वाटा रयतेला मिळेल आणि महसूल आपल्याला येईल ते करावे. रयतेवर काडीचाही जुलूम झाल्यास आम्ही तुझ्यावर राजी नाही हे नीट समजावे  "

 

याच पत्रात ते पुढं म्हणतात..

" ज्या गावी जातील तेथील सर्व कुणबी गोळा करावे. बैल, नांगर आणि पोटाकरिता धान्य नसल्यामुळं जो अडून निकामी झाला असेल त्याला दोन चार बैलांकरिता रोकड हाती देऊन आणि पोटाकरिता दोनचार खंडी धान्य द्यावे. त्याच्याने शेत करवेल ते करवून घ्यावे, नंतर बैलाचे व धान्याची रोकड वाढीदिडी न करता फक्त मुद्दलच हळूहळू त्याच्या ऐपती प्रमाणं वसूल करावी "

Similar questions