India Languages, asked by neetuabroluthra8390, 11 months ago

Short essay on importance of natural resources in Marathi

Answers

Answered by halamadrid
0

■■नैसर्गिक संसाधनांचे महत्व■■

पृथ्वीवर नैसर्गिक रूपात अस्तित्वात असलेले संसाधन म्हणजेच नैसर्गिक संसाधन.पानी, माती, पशुपक्षी, जमीन, वन,जीवाश्म इंधन, खनिज,खडक,इत्यादि हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे नैसर्गिक संसाधन आहेत.

नैसर्गिक संसाधनांमुळे सामाजीक, आर्थिक आणि तांत्रिक विकास होण्यास मदत मिळते. प्रत्येक प्रकारचा नैसर्गिक संसाधन कशा न कशा प्रकारे उपयोगी ठरतो.जगातील प्रत्येक क्षेत्रामध्ये नैसर्गिक संसाधनांचा प्रयोग केला जातो.

उर्जानिर्मितीसाठी जीवाश्म इंधनांची गरज लागते, विविध खनिज औद्योगिक विकासासाठी आवश्यक असतात.कृषी, व्यापार, आयात व निर्यात यांना वेग देऊन नैसर्गिक संसाधन आर्थिक विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावतात.घरगुती,व्यायवसायिक, औद्योगिक, कृषी आणि इतर विविध क्षेत्रांमध्ये नैसर्गिक संसाधनांचा वापर खूप उपयोगी ठरतो.

पण, जसजशी लोकसंख्या वाढत आहे, तसतसे या संसाधनांची मागणी सुद्धा वाढत चालली आहे. जर याच गतीने आपण या संसाधनांचा वापर करत गेलो, तर एक दिवशी हे नैसर्गिक संसाधन लुप्त होतील.नैसर्गिक संसाधनांशिवाय जगणे माणसांसाठी खूप कठिन होऊन जाईल.

म्हणून, नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.

Similar questions