English, asked by manohar1122k, 9 months ago

short essay on my mom in marathi ​

Answers

Answered by jhankruta89
7

Answer:

here is your answer ....please mark my answer as brainliest

Explanation:

माझ्या आई बद्दल मी काय लिहू? माझी आई माझा पहिला गुरु, जिने मला चालायला , बोलायला, हात धरून लिहायला शिकवले. खरंतर माझी आई खूप शिकलेली नाहीये, पण तिला शिक्षणाचं महत्व खूप लवकर कळले, आणि म्हणूनच तिने आम्हाला खूप शिकवण्याचा ठरवले. माझ्या आईने मला वाचनाची गोडी लावली. घराजवळील वाचनालयात ती मला खूप लहानपणापासून नेत असे. पुढे मोठा झाल्यावर मी रोज एक पुस्तक वाचून काढत असे. 

माझ्या आईने तिच्या लहानपणी खूप कष्ट केले आहेत आणि अजून हि करतेच आहे. माझी आई सुगरण आहे.  तिला वेगवेगळे पदार्थ तयार करता येतात आणि तिने मला हि थोडा स्वैपाक शिकवला आहे.

माझ्या आईने घरात कधीच मुलगा मुलगी असा भेदभाव केला नाही आणि आम्हा बहीण भावांना खूप शिकवले.माझी आई माझ्या वडलांच्या पाठीशी नेहेमी भक्कमपणे उभी राहिली आणि जमेल तशी त्यांच्या व्यवसायात त्यांना मदत सुद्धा करत आली आहे

आईने सर्व नातेवाईकांना आणि शेजाऱ्यापाजाऱ्यांना आपल्या आपुलकीने आणि मायेने जोडून ठेवले आहे. कोणाला कधीही काही मदत लागली तर माझी आई सर्वात पुढे असते.

अशा प्रेमळ, विविधगुणसंपन्न अशा माझ्या आईचा मला खूप अभिमान आहे.

Answered by bhaskarbehere71
5

Mark

Me

As

Brainlist

:)

Attachments:
Similar questions