India Languages, asked by Nishee123, 11 months ago

Short essay on sanikache manogat in Marathi

Answers

Answered by fifaworldcup
0

Answer:

Explanation:

marathi essay

Wednesday, 14 November 2018

TODAY'S WOMAN ESSAY IN MARATHI

                                                  TODAY'S WOMAN ESSAY IN MARATHI                                        

                              आजची स्त्री

      एक असा काळ होता कि स्त्री चे कार्यक्षेत्र घराच्या आताच होते. घरात पुरुषाचेच वर्चस्व असे. सर्व निर्णय पतीच घेई. एकदा निर्णय झाल्यावर पत्नीने चकार शब्द काढायचा नाही, अशी अवस्था होती. कार्यालयामध्ये स्त्री क्वचितच दिसत. संपूर्ण महाविद्यालयात दोन-चारच मुली असत. चारचौघात, चौकात, रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी मुली व स्त्रिया मोकळेपणाने बोलताना दिसत नसत. उच्च शिक्षणात तर पुरुषांचीच मक्तेदारी होती. या या पाश्ववभूमीवर आजचे दृश्य आश्चर्यचकित करणारे आहे.

      आजच्या  केलेली स्वतःची प्रगती ही खरोखरच आचर्यचकित करणारी आहे. समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले, आगरकर, महर्षी कर्वे यांनी भारतीय स्त्रीला हा आत्मविकासाचा मार्ग दाखवला आणि स्त्री विचार करू लागली. चूल आणि मूल यापेक्षाही वेगवेगळ्या क्षेत्रात आपण समर्थपणे, पुरुषच्या बरोबरीने कार्य करू शकतो, याची जाणीव तिला झाली.आज सर्व प्रकारच्या उच्च शिक्षणामध्ये स्त्रीने स्थान मिळवले आहे आता असे एकही क्षेत्र दाखवता येणार नाही कि ज्यात स्त्रीचा सहभाग नाही. अमुक अभ्यास स्त्रीला जमणार नाही; अमुक काम  स्त्रीला झेपणार नाही; अमुक गोष्ट स्त्रीच्या आवाक्याबाहेर आहे, असे पूर्वी मानले जाई. गेल्या काही वर्षांत स्त्रीने या साऱ्या चौकटींना धक्के देऊन आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे.

     आजच्या स्त्रीला कोणतेच क्षेत्र अगम्य राहिलेले नाही. उलट काही क्षेत्र तिने पूर्णपणे काबीज केली आहेत.ती उत्तम राज्यकर्ती बनली बनते ती वैद्यकीय क्षेत्रात, संशोधनाच्या क्षेत्रातही नेत्रदीपक कामगिरी करते. इतकेच नाही; तर ती रणरागिणीही बानू शकते. जग एवढे पुढारले आहे, पण हुंड्याच्या बाबतीत आपला देश अधिकाधिक मागासलेला बनत आहे. मुलगी जितकी जास्त शिकेल, तितका जास्त हुंडा देण्याची पाळी येते. याबाबतीत स्त्रियांनी बंडखोरी केल्याशिवाय समाजाचे मतपरिवर्तन होणार नाही.

      आजच्या स्त्रीची ताकद जबरदस्त वाढली आहे. ती शिक्षण घेते. विविध प्रकारची नोकरी करते. पण अजूनही घराची जबाबदारी मात्र तीच उचलते. शिवाय मुलांचा अभ्यास, त्यांच्या भविष्याची जडणघडण यांचा भारही स्त्रीने स्वतःवरच घेतला आहे. एवढे सगळे पेलण्याची प्रचंड क्षमता आजच्या स्त्रीने कमावला आहे आणि आपले आनन्यसाधारण  स्थान समाजाला दाखवून दिले आहे.

Similar questions