India Languages, asked by kamleshvaidya12, 5 months ago

Short information on Pandita Ramabai in marathi​

Answers

Answered by rithurithz
2

रमाबाई, पंडिता (Pandita, Ramabai) : (२३ एप्रिल १८५८ – ५ एप्रिल १९२२). स्त्रियांच्या-विशेषतः परित्यक्त्या, पतिता व विधवांच्या-सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने कार्यरत राहिलेली महाराष्ट्रीय विदुषी. रमा डोंगरे, पंडिता रमाबाई सरस्वती, रमाबाई डोंगरे, मेधावी, मेरी रमाबाई अशा स्थितंतरातून अतिशय खडतर आयुष्य जगलेली पंडिता रमाबाई सरस्वती बनली आणि स्त्री शिक्षणाची दीपस्तंभ ठरली.रमाबाई यांचा जन्म अनंतशास्त्री डोंगरे व अंबाबाई डोंगरे यांच्या पोटी तेव्हाच्या म्हैसूर संस्थानातील (कर्नाटक राज्य) मंगलोरजवळ माळहेरंजी जवळील गंगामूळ नावाच्या डोंगरावरील वस्तीत झाला. अनंतशास्त्री हे त्या काळी स्त्रियांच्या बाबतीत पुरोगामी विचारांचे होते. स्त्रियांना शिक्षण द्यावे, या मताचे ते होते. लक्ष्मीबाईंस व रमाबाईंस त्यांनी वेदादींचे शिक्षण दिले. रमाबाई नऊ वर्षांच्या झाल्या, तरी त्यांचे लग्न करून दिले नाही म्हणून ज्ञातिबांधवांनी त्यांना वाळीत टाकले. रमाबाईंच्या जन्मानंतर सहा महिन्यांतच आई-वडिलांना लोकांच्या त्रासामुळे सर्व मुलांना घेऊन तीर्थयात्रेला पायी निघावे लागले. या तीर्थयात्रेच्या १५-१६ वर्षांच्या कालखंडात रमाबाईंना आई-वडिलांपासून, विशेषतः आईकडून, संस्कृत व्याकरण व साहित्याचे शिक्षण मिळाले. १८७७ साली दुष्काळात रमाबाईंचे आई-वडील वारले. रमाबाईंनी संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळविले होतेच; पण मराठी, हिंदी, बंगाली आणि कन्नड भाषाही त्या अस्खलितपणे बोलू शकत होत्या. त्याचबरोबर त्यांना गुजराती, तुळू व हिब्रू या भाषाही अवगत होत्या. १८७८ साली त्यांचे बंधू श्रीनिवासशास्त्री यांच्यासह प्रवास करीत त्या कलकत्त्याला आल्या. तेथे मात्र त्यांच्या विद्वत्तेचा व बुद्धिमत्तेचा उचित गौरव झाला. कलकत्त्याच्या सिनेट हॉलमध्ये त्यांना ‘पंडिता’ व ‘सरस्वती’ या बिरुदावली बहाल करण्यात येऊन त्यांचा गौरव करण्यात आला. ‘पंडिता’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या रमाबाई या एकमेव महिला होत. बंगाली स्त्रियांनीही त्यांना ‘भारतवर्षीय स्त्रियांचे भूषण’ म्हणून मानपत्र दिले.

रमाबाईंचा कलकत्ता येथे केशवचंद्र सेन यांच्याशी संबंध आला आणि हिंदू धर्माविषयी त्यांच्या मनात काहूर उठले. तत्पूर्वीही त्या हिंदू धर्माविषयी साशंक झाल्याच होत्या. रमाबाईंचा अशा रीतीने सर्वत्र सत्कार होत असतानाच त्यांच्या बंधूंचा १८८० मध्ये मृत्यू झाला. त्या आता एकाकी झाल्या; परंतु कलकत्त्यातील बिपिन बिहारीदास मेधावी या शूद्र जातीतील पदवीधर व पुरोगामी विचारांच्या वकिलांनी मागणी घातल्यानंतर त्याच वर्षी त्यांच्याशी त्यांनी विवाह केला. आंतरजातीय विवाह करून रमाबाईंनी चुकीच्या रुढींविरूद्ध बंड पुकारले होते. वैवाहिक जीवन फार काळ त्यांना लाभू शकले नाही; कारण थोड्याच दिवसांत (४ फेब्रुवारी १८८२) अल्पशा आजाराने त्यांचे पती मरण पावले. वडील, आई, बहिण, भाऊ, पती यांच्या मृत्यूनंतरही त्या खचल्या नाहीत. ३१ मे १८८२ रोजी आपली एकुलती एक मुलगी मनोरमा हिला सोबत घेऊन त्या पुण्यास येऊन स्थायिक झाल्या व त्यांनी स्वतःला पूर्णतः समाज कार्याला वाहून घेतले.

बालविवाह, पुनर्विवाहास बंदी इत्यादी घातक चालीरीती व दुष्ट रूढी यांतून समाजास मुक्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी १८८२ मध्ये प्रथम पुणे येथे व नंतर अहमदनगर, सोलापूर, ठाणे, मुंबई, पंढरपूर, बार्शी इत्यादी ठिकाणी ‘आर्य महिला समाजा’ची स्थापना केली. त्यामार्फत त्यांनी पुरोगामी विचाराची पेरणी सुरू केली. त्यांनी याच वर्षी स्त्रीयांसंदर्भातील स्त्रीधर्मनीति नामक पुस्तक लिहिले. मे १८८३ मध्ये स्त्रियांच्या उद्धाराकरिता अधिक प्रभावी कार्य करता यावे म्हणून इंग्रजी भाषा व वैद्यक या विषयांच्या शिक्षणाकरिता त्या कन्या मनोरमेसह इंग्लंडला गेल्या. हा प्रवासखर्च त्यांनी स्त्रीधर्मनीति या पुस्तकाच्या विक्रीतून केला. इंग्लंडमध्ये त्या वाँटिज गावच्या सेंट मेरी या मठात राहिल्या. येशू ख्रिस्ताच्या पतित स्त्रियांबाबतच्या दृष्टिकोणामुळे, तसेच भूतदया व प्रेमाच्या शिकवणीने त्या ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित झाल्या. परिणामतः २९ सप्टेंबर १८८३ रोजी वाँटिज येथील चर्चमध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. त्यामुळे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या बरोबरच सनातनवादी विचारवंतांचा त्यांनी रोष ओढवून घेतला. त्यांना हिंदू धर्मातील मूर्तिपूजा, पुजाऱ्यांचा दांभिकपणा, देवापर्यंत पोहोचवण्यास लागणारे मध्यस्थ हे त्यांना मान्य नव्हते. मुक्तीसदन बांधण्यापासून ते पूर्ण होऊन त्यांचे कार्य सुरू होईपर्यंत आणि त्यानंतरही रमाबाई पूर्णपणे ख्रिस्तावर विसंबून होत्या. म्हणूनच मुक्ती सदन अथवा मुक्तीमिशन हे रमाबाईंच्या प्रभुवरील प्रगाढ श्रद्धेचे प्रतिक होते. १९१३ मध्ये मुक्ती सदन येथे रमाबाईंच्या कन्या मनोरमा या अंध विद्यार्थ्यांना ब्रेल लिपीतून शिकवित असत. त्यावरून त्यांचे मानवतावादी कार्य समोर येते.

Hope it helps!!!!

Similar questions