short moral story in marathi
Answers
Answer:
एक शेतकरी शेतातून फेरफटका मारत असताना त्याला काटेरी झाडाला एक गरुड अडकलेला दिसला. त्याला पक्षाची दया आली, त्याने हळूवार हाताने गरूडाची काट्यातून सूटका केली. सूटका होतांच गरूड आकाशांत उडून घिरटया घालू लागला.
ऊन तापू लागले म्हणून तो शेतकरी एका पडक्या भिंतीच्या सावलीत बसला इतक्यात घिरट्या घालणारा गरुड खाली झेपावला आणि शेतकऱ्याच्या डोक्यावरील पागोटे चोचीत पकडून दूर टाकून दिले. हा प्रकार पाहताच शेतकऱ्याला त्या गरुडाचा खूप राग आला.
दया येऊन आताच मी त्याला संकटातून सोडवले आणि हा गरुड माझी अशी चेष्टा करतो. म्हणून शेतकऱ्याने गरुडाला दोन – चार शिव्याही दिल्या. मग आपले पागोटे घेण्यासाठी तो भिंतीजवळून उठला. थोडे अंतर गेला तोच ती भिंत धडाधडा ढासळून दगड इतस्तह बिखरून पडले.
शेतकऱ्याच्या लक्षात आले गरुडमुळेच आज आपला जीव वाचला. त्याने मनातल्या मनात गरुडाचे शतशः आभार मानले.
i hope it will help u
pls mark me as brainlist and follow me