India Languages, asked by bijukumarmnj1468, 1 year ago

short stories in marathi

Answers

Answered by Anonymous
44
"चव आणि भय"

एका झाडावर दोन बहिरीससाणे राहत होते. बहिरीससाणा हा शिकारी पक्षी असतो. सकाळीच दोघे शिकारीच्या शोधात निघत. जे काही पकडून आणीत ते वाटून मिळून खात. अनेक दिवसांपासून त्यांचा हा क्रम सुरू होता.

एके दिवशी दोघे शिकार पकडून आले. एकाच्या चाेचीत उंदीर होता, तर दुसऱ्याच्या चाेचीत छोटा साप हाेता. दोन्ही अजून जिवंत होते. झाडाच्या फांदीवर दोघे बसले होते तेव्हा त्यांनी चाेचीत पकड थोडी ढिली केली. तेव्हा सापाने उंदराला आणि उंदराने सापाला बघितले.

उंदराची स्वादिष्ट चवदार भोजन मिळवण्यासाठी सापाची जीभ लालचावली. सापाचे प्रयत्न बघून उंदीर घाबरला. ज्या ससाण्याने उंदराला पकडले होते, त्या ससाण्याच्या पंखात लपण्याचा प्रयत्न करू लागला. हे दृश्य बघून एक ससाणा गंभीर झाला. ताे विचारमग्न झाला. तेव्हा दुसरा ससाणा त्याला म्हणाला, "मित्रा, एखाद्या तत्त्वज्ञानाप्रमाणे विचारात काय गढलास?"

ज्याने चाेचीत साप पकडला होता, तो बहिरीससाणा सापाकडे निर्देश करीत म्हणाला, "बघा कसा मूर्ख प्राणी आहे. समोर मरण असतानाही जीभेच्या चाेचल्यासाठी त्याला मरणाचे विस्मरण होत आहे."

दुसरा बहिरीससाणा उंदराबद्दल सांगत म्हणाला, "ह्या अज्ञानी प्राण्यालाही बघ. त्याला प्रत्यक्ष मरण्यापेक्षाही भय जास्त भीतीदायक वाटत आहे."

झाडाच्या खाली खाली सावलीत एक प्रवासी विश्रांती घेत होता. त्यांनी दोन्ही बहिरीससाण्यांची गोष्ट ऐकली. तेव्हा एक दीर्घ श्वास घेऊन ताे मनाशी म्हणाला, 'आम्ही मानव प्राणीही साप व उंदीरप्रमाणेच चव व भय यानांच मोठे समजतो. मरणाचे तर आम्हालाही विस्मरणच झालेले असते.'
Similar questions