India Languages, asked by bhavika99, 1 year ago

short story in marathi

Answers

Answered by Anonymous
18
"अंतराळात युद्ध"

पाचवीत शिकणारा राजू आपल्या आजोबांबरोबर गावात राहायचा. अभ्यासाव्यतिरिक्त त्याच्या बराच वेळ त्याच्या आजोबांबरोबर जायचा.

आजोबा दररोज रात्री त्याला चांगल्या चांगल्या आणि संदेश देणाऱ्या गोष्टी सांगायचे. मग गोष्ट ऐकता ऐकता त्याला झोप लागायची. तो कायम स्वप्नांमध्येही गोष्टी पाहायचा.

उन्हाळ्याची रात्र होती. राजू आजाेबांबरोबर गच्चीवर झोपला होता. आकाशात खूप चांदण्या होत्या आणि त्यांच्या मधोमध पूर्ण चंद्रही प्रकाशमान होता.

"आजोबा, या चांदण्या आणि चंद्र आपल्यावर का पडत नाही बरं?" राजूने आजोबांना विचारलं.

"कारण हे सगळे आपापल्या कक्षेत सूर्याच्या भोवताली भ्रमण करत राहतात, आपली पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करते," आजोबा म्हणाले.

"आजोबा, अंतराळात कोण कोण राहतं बरं?" राजूने विचारलं.

"अंतराळात नऊ ग्रह, काही उपग्रह आणि तारे राहतात. हे सगळे सूर्याभोवती भ्रमण करत असतात," आजोबा म्हणाले.

काही वेळाने राजूला झोप लागली. स्वप्नात तो ग्रहांवर फिरत होता.

ग्रहांमध्ये आणि उपग्रहांमध्ये 'श्रेष्ठ कोण' यावरून युद्ध सुरू होतं.

सूर्य, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून सगळे आपापली स्तुती करत होते.

"मी सर्वात जास्त चमकणारा ग्रह आहे. आणि माझं वैशिष्ट्य म्हणजे मी पूर्वीपासून पश्चिमेकडे भ्रमण करतो. पण तुम्ही सगळे तर पश्चिमे पासून पूर्वेकडे भ्रमण करतात. मला तर प्रेमाने लोक देवही समजतात, " शुक्र ग्रह म्हणाला.

"मी एकमेव असा ग्रह आहे, ज्यावर जीवन आहे, पाणी, वारा आणि माणसं आहेत," पृथ्वी ही गर्वाने म्हणाली.

"मी लाल रंगाचा आहे, आणि मला युद्धाचा देवही म्हटलं जातं," मंगळही मागे नव्हता. ताेही पटकन म्हणाला.

"माझ्या जवळ सर्वात जास्त तारे आहेत," गुरु म्हणाला.

"आणि आम्ही मोठ्या ग्रहांमध्ये मोडतो," शनी ग्रहानेही गुरुला दुजोरा दिला.

"मी हिरव्या रंगाचा आहे, आणि मीही मोठा आहे. ग्रीक लोक मला देव मानून माझी पूजा करतात," युरेनस म्हणाला.

"मी स्वतः निळ्या रंगाचा असून सर्वात मोठा आहे, आणि मी समुद्राचा देव आहे," नेपच्यून म्हणाला.

ग्रहांचा मी पणा ऐकून चंद्रालाही चेव चढत होता.

"मी सर्वात जास्त सुंदर आहे. मी पृथ्वी ग्रहाचा एकमेव उपग्रह आहे. माझ्यावर ही जीवनमान होऊ शकतं, असा अंदाज लावला जात आहे. मी सूर्याच्या मार्गात आडवा येऊन ग्रहणे लावू शकतो," चंद्र म्हणाला.

चंद्राचा गर्भ सर्वांनाच माहीत होता. म्हणून सगळेच गप्प झाले.

त्यांच्या भांडणाने प्लूटाे ग्रह चिंतित झाला होता. त्याला त्याच्यां मध्ये पडायचं नव्हतं; कारण तो सर्वात लहान ग्रह होता.

पण शेवटी त्याला राहवलं नाही, "तुम्ही सगळे मूर्ख आहात." तेव्हा सगळ्यांनी त्याच्यावर डोळे वटारले.

"तुम्हा सर्वांपेक्षा जास्त बळकट सूर्य आहे," तो म्हणाला.

"ते कसं बरं?" सर्वांनी एकदमच विचारलं.

"संपूर्ण अंतराळात ९९.८ टक्के वजन तर सूर्याचंच आहे. त्याचं तापमानही सर्वात जास्त आहे. त्यामुळे तो सर्व ग्रहांना उर्जा पुरवितो. हा सर्वांत जास्त चमकणारा ग्रह आहे, जो सर्व ग्रह आणि उपग्रहांना प्रकाश देतो," फ्लॅटचे म्हणाला.

"सूर्यावर गरम गैसही आढळतात. रात्र आणि दिवसही सूर्यामुळेच होतात," तो म्हणाला.

इवल्याशा ग्रहाकडून समजूतदारपणाच्या गोष्टी ऐकून सर्वांना जाणीव झाली की ते सगळे किती चुकीचं बोलत होते. मग सर्वांनी मिळून सूर्याची माफी मागितली.

"तुमच्या तापमानामुळेच आम्ही सगळे जिवंत आहोत. झाडं, राेप आपलं अन्न तयार करतात," राजूही मध्येच बोलू लागला. पण त्याचं बोलणं काेणीच ऐकत नव्हतं.

"राजू उठ, सकाळ झाली आहे," आजोबा म्हणाले तेव्हा राजूचे डोळे उघडले.

'अरे, तर ते स्वप्न होतं तर,' राजू मनातल्या मनात म्हणाला.

"पण ग्रहांसोबत खूपच मज्जा आली." राजू खूष होऊन विचार करत होता.
Similar questions