India Languages, asked by torral8641, 9 months ago

shramdan essay in marathi language

Answers

Answered by atharvhkhedekar
1

Explanation:

याच महिन्यात पाण्यासाठी आम्ही लोकल ट्रेनमध्ये पथनाटय़ सादर केलं. परंतु पाणीबचतीसाठी आणखी काहीतरी करायला हवं याचा विचार आम्ही करत होतो. त्यामुळे आम्ही ‘एक दिवस दुष्काळग्रस्तांसोबत: चला श्रमदान करू या’ हा उपक्रम हाती घेतला. श्रमदान करताना आम्हा तरुणांना आलेला हा अनुभव.

lead1

तरुणांनी तरुणांसाठी स्थापन केलेल्या शिवसह्याद्री प्रतिष्ठानने स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीचे औचित्य साधून ‘एक दिवस दुष्काळग्रस्तांसोबत : चला श्रमदान करू या’ ही मोहीम आखली. मोहिमेची संकल्पना तयार करताना आम्ही चर्चा करायचो, तेव्हा हा उपक्रम एवढं मोठं स्वरूप घेईल असं कधीच वाटलं नव्हतं.

फक्त १०-१२ जणांनी जायचं आणि श्रमदान करून परतायचं; पण, मोहिमेची तयारी करत असताना लोकांनी आम्हाला खूप प्रतिसाद दिला. जसजसं मोहिमेचा दिवस जवळ येत होता तसतसं लोकांनी आमच्याशी संपर्क साधला आणि आगळ्यावेगळ्या श्रमदानाच्या मोहिमेत यायला लोक तयार होऊ लागले.

उपक्रमाच्या पूर्वतयारीसाठी काही स्वयंसेवक सातारा येथे गेले होते. पाणी अडवा आणि माती जिरवा ही संकल्पना ज्यांनी महाराष्ट्राला दिली ते साता-यातील डॉ. अविनाश पोळ (दंत वैद्य) यांची भेट घेतली आणि तसेच बिचुकले गावातील लोकांशी संवाद साधला.

मोहिमेची तयारी झाली, शिवसह्याद्री प्रतिष्ठानने केलेल्या माहितीपटावर लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया वाखाणण्याजोग्या होत्या. ही मोहीम दोन दिवसात विभागली गेली होती आणि तो मोहिमेचा दिवस उजाडला २१ मे रोजी. मुंबईहून सकाळी ८ वाजता तब्बल ३० स्वयंसेवक घेऊन शिवसह्याद्री प्रतिष्ठान बिचुकले गावच्या दिशेने निघाले.

दुपारी गावात पोहोचल्यावर गावक-यांनी पारंपरिक शिरा-भाताचे जेवण वाढून आमचे गावात स्वागत केले. आम्हाला आराम करण्यासाठी गावातील विठ्ठल-रखुमाईच्या देवळात व्यवस्था केली होती. मोहिमेसाठी वेगवेगळ्या शहरातून लोकं आलेली, त्यामुळे एक ओळखसत्र घेण्याची गरज होती. ओळखसत्र घेतल्यावर आम्ही देवळात सुश्राव्य गाण्यांच्या बैठकीचा कार्यक्रम घेतला. सायंकाळी आम्हाला गावात जनजागृतीपर पथनाटय़ करायचं होतं. विठ्ठल-रखुमाईच्या आशीर्वादाने आम्ही त्या देवळाच्या आवारात अगदी कमी वेळात पथनाटय़ बसवायला सुरुवात केली. पथनाटय़ाचा सराव झाल्यावर आम्ही गावातील अण्णा म्हणजे संभाजी पवार यांच्याशी चर्चा केली. त्या चर्चेत पाणी फाऊंडेशनचे पदाधिकारी देखील सामील झाले.

‘पाणी वाचवा आणि श्रमदान करा’ अशा घोषणा संध्याकाळच्या वेळेस गावच्या वेगवेगळ्या चौकांमध्ये दिल्या. गावातले लोक एका ठिकाणी जमले, त्यानंतर आम्ही जनजागृतीपर पथनाटय़ केलं. पथनाटय़ातून आम्ही आजच्या समस्या, पाण्याचे महत्त्व, गटबाजी व राजकारण करू नये तसेच श्रमदान ही काळाची गरज आहे आणि अशा महत्त्वाच्या विषयांवर लोकांचे लक्ष केंद्रित करून घेतले. त्यानंतर संभाजी पवार ऊर्फ अण्णा यांनी श्रमदानात नक्की काय करायचे आहे व कशाप्रकारे करायचे आहे याची माहिती दिली.

दुस-या दिवशी म्हणजेच रविवारी सूर्य उगवायच्या आधी म्हणजे पहाटे ४ वाजता आम्ही उठलो, सगळ्यांचे आवरून झाल्यावर व्यायाम करून श्रमदासाठी सज्ज झालो. श्रमदानाच्या ठिकाणी आम्ही ट्रॅक्टरने पोहोचलो. प्रत्येकाच्या हातात कुदळ, फावडं, घमेलं असे साहित्य होतं. आम्हाला ओढा रुंदीकरणाचं काम होतं.

तसेच, शिवसह्याद्री प्रतिष्ठानला श्रमदानात हातभार लावण्यासाठी कट्टा ग्रुप, शाहूपुरी, सातारा हे सुद्धा एकत्र आले. कट्टा ग्रुपमधील शिरीष गवळी असं म्हणाले की,‘जर मुंबईतील मुलं आमच्या साता-यात येऊन श्रमदान करत असतील तर आम्ही सातारकरसुद्धा तुम्हाला मदत करू. आपल्या माय-मातीची काळजी आपण नाही घेणार तर कोण घेणार?’ श्रमदान सुरू असतानाच डेप्युटी कलेक्टर अजय पवार यांची उपस्थितीमुळे आम्हाला हुरूप आला.

श्रमदानाला आलेले गावकरी व डेप्युटी कलेक्टर अजय पवार यांना पथनाटय़ करून दाखवले व अजय पवारसुद्धा आमच्या सोबत श्रमदानाला आले. ओढा रुंदीकरण झाल्यावर संभाजी पवार यांनी एका डोंगरावर नेले. तेथे उतारावर लूज बोल्डर्स (दगडी बंधारे), एलबीएस बंधारे, सीसीटी खड्डे कसे बांधायचे याविषयी मार्गदर्शन केले आणि आम्ही सगळे कामाला लागलो. ७-८ जणांचा समूह बनवून आम्ही दगडी बंधारे बनवायला सुरुवात केली आणि एकूण २३ बंधारे बांधले गेले.

अशाप्रकारे आम्ही श्रमदानाला सुरुवात केली आणि सकाळचं हे श्रमदानाचं सत्र संपवून, भोजन, आराम आटपण्यास देवळात परतलो. श्रमदानात आम्हाला मानवनिर्मित ओढय़ात एलबीएस बंधारे तयार करायचे होते. संभाजी पवार यांनी आम्हाला ५-५च्या गटात विभागले आणि प्रत्येक गटाने निदान ५ एलबीएस बंधारे बांधायचे असं ठरलं. श्रमदान झाल्यावर आम्ही सारे डोंगरावरच गोल करून बसलो.

आमच्यातील उत्स्फूर्त कलाकारांनी वीर गीत, एकपात्री आणि भारूड यांसारख्या कला सादर केल्या. आम्ही साधारण ७.३०च्या सुमारास देवळात परतलो. रात्रीच्या जेवणानंतर गावकरी, अण्णा तसेच गावच्या सरपंच साधना पवार आमच्याशी आजच्या श्रमदानानिमित्त चर्चा करण्यास आल्या. सीसीटी खड्डे, एलबीएस बंधारे कशा प्रकारे मातीची धूप थांबवण्यासाठी मदत करतात ते सांगितले.

Similar questions