shrtkarice manogat nibandh
Answers
Answered by
2
शेतकऱ्याचे मनोगत
मी आहे एक छोटा शेतकर. महाराष्ट्रातील मराठवाड्यातील एका आडगावात माझी थोडी जमीन आहे. फारशी सुपीक नाही; पण नापीकही नाही. या जमिनीवर माझं जीवापाड प्रेम आहे; पण या प्रेमानं काय भागणार? पीक अवलंबून असत ते त्या लहरी राजावर म्हणजे आपल्या पावसावर !
आमच्या गावाच्या जवळपास मोठी नदी. लहानसहान नद्यांना पाणी असतं, पण तेही पावसावरच अवलंबून. उन्हाळ्यात त्यापण आटून जातात त्यामुळे मृगाचं नक्षत्र आलं की, आम्हां शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागतात. कुठ दिसतोय का आमचा काळा विठोबा ! म्हणजे काळा ढग हो ! शेत नागरून ठेवायची , काटकूट काढायचं ढेकळं फोडायची आणि पावसाची वाट बघत रहायचं. अंग उन्हात नुसतं भाजून निघायचं, पण पाण्याचा पत्ताच नही. चार-चार पाच-पाच कोसावरून बाया पिण्यासाठी पाणी आणतात.
मग कधीतरी अवचित मळभ येतं. अंग गदगदून निघत सोसाट्याच वारं सुटत. इतक्यात पावसाचे थेंब पटपट गळू लागतात.क्वचित कधीतरी गारा पडतात आणि गारांनी अंगण भरून जातं. सारा गाव-लहानमोठी म्ह्तारीकोतारी त्या पावसात न्हाऊन निघतात पावसात फक्त शरीरच भिजतात , असं नाही; तर मनही निवतात.
आता शेतीला लागायला हवं भिजलेल्या जमिनीत बी-बियाण टाकायला हवं. पाऊसराजने अशी कृपा केली की रोपं तरारून येतात. पण सगळं काही अवलंबून त्या पावसावर. तेवढ्यात येईल ते पीक, मिक्तील ते दाने.त्यावर सगळं वर्ष काढायचं, हेच आम्हा कोरडवाहू शेतकऱ्याच नशीब ! पोळा झाला की पाऊस सरला. उरलेल्या आठ महिन्यांत दुसरी पिक घेता येत नाही. कमी पाण्यावरची नाचणी वरईसारखी पिकं घ्यावी लागतात. त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्याच्या नशिबी कायमचं दारिद्र्य ! कायमची उपासमार ! काय करणार ? मग सरकारकडे उंबरठे झिजवावे लागतात. भरमसाठ वयाने पैसे घ्यावे लागतात. मग ते फेडता फेडता अर्धा जीव जातो
आमच्या गावापासून बऱ्यापैकी. अंतरावरून मांजरी नदी वाहत. इकडच्या भागातील नद्यांमध्ये ती बऱ्यापैकी मोठी आहे. या नदीवर धरण बांधलं आणि काल्वांच्या मदतीने तीच पाणी आमच्या गावात खेळवलं तर गावाचा किती फायदा होईल !आम्ही पण दोन पिककाढू सकू,बागायत करू सकू ; पण हे आमच मनोगत पूर्ण होणार ? परमेश्वर आणे !
I hope this will help you
if not then comment me

Similar questions