Solid waste management information in marathi wikipedia
Answers
Answered by
0
सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेकडून विविध पर्यायांची आखणी
देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख बनलेल्या आणि देश-विदेशी पर्यटकांचे आकर्षण असलेल्या मुंबईतील कचरा व्यवस्थापनासाठी बडोदा, राजकोट, भोपाळ, अहमदाबाद, बंगळूरु, पणजीचा कित्ता गिरविण्याचा विचार पालिका प्रशासन पातळीवर सुरू आहे. या शहरांतील कचरा व्यवस्थापनाप्रमाणेच सुक्या कचऱ्याची स्वत:च विल्हेवाट लावण्याचा अथवा या कामासाठी सामाजिक संस्था किंवा कंपन्यांची मदत घेण्याचा विचार पालिका प्रशासन पातळीवर सुरू झाला आहे. त्या दृष्टीने लवकरच एक योजना आखण्यात येत असून सध्या कार्यरत असलेल्या ३७ कचरा वर्गीकरण केंद्रे पालिकेच्या नियंत्रणाखाली आणण्यात येणार आहेत.
मुंबईमध्ये आजघडीला साधारण ७५०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. त्यामध्ये १५ ते २० टक्के सुक्या कचऱ्याचा समावेश असतो. पूर्वी हा सर्वच कचरा एकत्रितरीत्या देवनार, कांजूर आणि मुलुंड कचराभूमींमध्ये टाकण्यात येत होता. गेल्या काही वर्षांपासून पालिका मुंबईकरांना ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवण्याचे आवाहन करीत आहे. काही सोसायच्या ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे ठेवतही होत्या. मात्र सुका कचरा वाहून नेण्याची यंत्रणाच पालिकेकडे नव्हती. त्यामुळे स्वतंत्र ठेवलेला कचरा एकत्र करून कचराभूमीत टाकण्यात येत होता. मात्र पालिकेच्या आवाहनाला मुंबईकरांकडून फारसा प्रतिसाद मिळू शकलेला नाही. आता पालिकेने सुका कचरा वाहून नेण्यासाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था केली आहे. तसेच पालिकेने ३७ ठिकाणी सुका कचरा वर्गीकरण केंद्रे सुरू केली आहेत.
पालिकेच्या कचरा वर्गीकरण केंद्रांमध्ये कचरा वेचक कचरा घेऊन येतात आणि तो वेगवेगळा करतात. कचऱ्यातील प्लास्टिक, धातू, कागद वेगवेगळे केले जाते. संध्याकाळी तेथे भंगारवाला येतो आणि वर्गीकरण केलेला कचरा खरेदी करून घेऊन जातो. या केंद्रांमध्ये कचरा वर्गीकरणाचे काम करणाऱ्या कचरा वेचकांना त्यामुळे रोजगार मिळाला आहे. मात्र या कचरा वर्गीकरण केंद्रावर पालिकेचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही.
पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या आदेशानुसार ‘ए’ विभाग कार्यालयातील साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर आणि ‘एच-पश्चिम’ विभाग कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त शरद उघाडे यांनी अलीकडेच अहमदाबाद, बडोदा, राजकोट, भोपाळ, इंदूर, बंगळूरु, गोवा येथील कचरा व्यवस्थापनाच्या कामाची पाहणी केली. यापैकी काही शहरांमध्ये कचरा व्यवस्थापनाच्या कामासाठी सामाजिक संस्था अथवा कंपन्यांची मदत घेण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. तेथील पालिकांकडून सामाजिक संस्था अथवा कंपन्यांना जागा उपलब्ध करण्यात आली असून ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती, तर पुनर्वापरयोग्य सुक्या कचऱ्याची विक्री करण्यात येत आहे. बंगळूरुमध्ये दर बुधवारी आणि रविवारी केवळ सुका कचरा गोळा केला जातो. नागरिक बुधवारी आणि गुरुवारी आपल्या घरातच ओला कचरा साठवून ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी पालिका तो घेऊन जाते. मात्र यासाठी नागरिकांकडून सहकार्य करण्यात येत आहे. त्यामुळेच बंगळूरुमध्ये ही योजना यशस्वी होऊ शकली, असे या शहरांच्या अभ्यास दौऱ्यावर गेलेल्या अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. घनकचरा व्यवस्थापनाबाबतचा या शहरांमधील कित्ता मुंबईमध्ये गिरविण्याचा विचार प्रशासन पातळीवर सुरू झाला आहे.
आवश्यक असलेली यंत्रसामग्री खरेदी करून स्वत:च सुक्या कचऱ्याचे व्यवस्थापन करणे किंवा सामाजिक संस्थेला जागा उपलब्ध करून कचऱ्याचे व्यवस्थापन करवून घेणे. अथवा कचरा व्यवस्थापनासाठी सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून कंपनीची मदत घेणे, असे तीन पर्याय पालिका प्रशासनासमोर आहेत. या तिन्ही पर्यायांचा प्रशासन पातळीवर अभ्यास सुरू असून लवकरच यापैकी एक पर्याय कचरा व्यवस्थापनासाठी निवडण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबईमधील सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास गती मिळू शकेल, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Similar questions
French,
6 months ago
Math,
6 months ago
English,
6 months ago
Political Science,
1 year ago
English,
1 year ago