Sparrow info in marathi
Answers
Answer:
चिमणी हा रोजच्या परिचयाचा पक्षी आहे. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत या चिमण्या आपल्या आसपास चिवचिव करत असतात त्या सर्वत्र दिसतात.
चिमण्यांमध्ये नराच्या अंगावर पिसांचा तपकिरी काळसर रंग असतो. डोक्यावर राखी रंग असतो. चोचीखाली कंठाला छातीला काळा रंग असतो. पाठीवर लहान लहान काळे पट्टे असतात. त्यांच्या पोटाचा रंग पांढरा असतो. मादीत असे काही दिसत नाही. मादीचा रंग फिकट उदी असतो. मादीपेक्षा नर थोडा मोठा असतो. चिमणीची चोच बारीक आणि बळकट असते. चिमण्या धान्याचे बारीक कण, लहान अळ्या, किडे, मुंग्या खातात. सांधी फटीतील बारीक किडे खातात. त्यांना शिजवलेले अन्न खायला चालते.
चिमणीचे पाय बारीक असून त्यावर पिसे वगैरे काही नसतात. त्याच्या पायांना पुढे तीन आणि मागे एक अशी चार बोटे असतात. मागचे बोट थोडे मोठे असते. त्यामुळे त्यांना दांडीवर, झाडावर फांदीवर बसणे सोयीचे असते. चिमण्या जमिनीवर नीट उभ्या राहू शकतात. आणि टुणटुण उडय़ा मारून चालूही शकतात. चिमणी हा पक्षी लहान असूनही धीट आहे. विणीचा हंगाम जवळ आला की, चिमणी-चिमणा (नर व मादी) आपली घरटी भिंतीच्या बिळात अथवा फटीत, सांधीच्या कोपऱ्यात, घराच्या पटईच्या सापटीत तयार करतात. घरटी चिंध्या, दोरे, गवत-काडय़ा, कापूस
यापासून तयार करतात. चिमण्या बारा मास अंडी घालतात, तरी त्यांची वीण उन्हाळ्यात जास्त प्रमाणात असते. मादी दर खेपेस पाच सहा अंडी घालते. त्यांची अंडी द्राक्षाएवढी
लहान लहान असतात. ती निळसर असतात. अंडी उबविण्याचे काम मादीच करते. १५ दिवसांनी अंडय़ातून पिलू बाहेर येते. पिले मोठी होऊन उडू लागली की, चिमण्या घरटी सोडून उडून जातात. चिमणीचे वयोमान अवघे ४० वर्षे आहे. चिमणीला बहिरी ससाण्याची खूप भीती वाटते. कावळे चिमणीच्या घरटय़ावर अंडय़ांसाठी धाड घालतात. तेव्हा सर्व चिमण्या एकत्र येऊन संरक्षणासाठी किलबिलाट करतात.
Explanation: