English, asked by alqama, 1 year ago

speach 0n sound pollution in marathi

Answers

Answered by tejasmba
0

ध्वनि प्रदूषण

प्रदूषण ही एक सर्वात मोठी समस्या आज आपल्याला जानवत आहे. बदलत्या काळानुसार आपणही 
बदलत असतो व प्रगतीच्या विवीध शिखरांवर पोहचत असतो. परंतु हे करत असताना निसर्गाची व 
स्वत:ची जी हानी होत असते त्याकडे आपण कळत नकळत का होइना दुर्लक्ष करत असतो. पण हे प्रदुषण म्हणजे नक्की तरी काय?

प्रदूषण म्हणजे जीवन नष्ट करणारे अथवा विस्कळीत करणारे घटक. प्रदूषण अनेक प्रकारचे असतात. उदाहरणार्थ वायू प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनि प्रदूषण इत्यादि.

ध्वनि प्रदूषण म्हणजे काय?

मनुष्य, प्राणी किंवा यांत्रिक पर्यावरणा मुळे निर्माण झालेला, मर्यादेपली कडील, असहनीय आवाज म्हणजे ध्वनी प्रदूषण. माणसाच्या कानांची, ऎकण्याची एक विशिष्ठ मर्यादा असते, जेव्हा त्या मर्यादेपेक्षा जास्त ध्वनी येतो तेव्हा तो आपल्या आरोग्यास हानीकारक असतो व त्या परीस्थीतीला ’ध्वनि प्रदुषण’ असे म्हणतात.

आवाजाची तीव्रता डेसिबेल (डीबी) या एककात मोजली जाते. साधारणतः: 80 डीबी पर्यंतचा आवाज मनुष्याला सहन होऊ शकतो. त्यापेक्षा मोठ्या आवाजाचा त्याला त्रास होतो. विमाने व रॉकेटे यांचा आवाज 100 तो 180 डीबी एवढा तीव्र असतो. तसेच सार्वजनिक कार्यक्रम, बांधकाम, इत्यादी ठिकाणी आवाजाची पातळी 120 डीबी पेक्षा जास्त असते. नैसर्गिक आपत्तींच्या वेळी उदाहरणार्थ जोराचा वारा, गडगडाटी वादळे, भूकंप अशा वेळी आवाजाची तीव्रता वाढते. मात्र या घटना क्वचितच घडतात. शहरात अनेक मानव निर्मित कृतींमुळे ध्वनी प्रदूषण होते. उदा., घरातील टीवी चा आवाज, मिक्सर, म्यूजिक सिस्टम, विविध प्रकारचे कारखाने, वाहने, बांधकाम इत्यादी.

ध्वनिप्रदूषणामुळे मनुष्याच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य या दोघांवरच परिणाम होतो. ध्वनीची पातळी वाढली की माणसांमध्ये ताण वाढून हृदयाची धडधड वाढते, रक्तदाब वाढतो आणि हृदयाचे विकार होऊ शकतात. त्याला आवश्याक असलेली झोप मिळत नाही आणि त्यामुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडते व तो अस्वस्थ होतो. तसेच त्याचे लक्ष विचलित होते, तो चिडचिडा होतो, त्याची कार्यक्षमता घटते व त्याच्या पचनक्रियेत देखील बदल होतो. नेहमी होणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे बहिरेपणा येतो. हृदयरोग असलेली व्यक्ती मोठमोठ्या ध्वनि वर्धकाच्या आवाजाने दगावण्याची शक्यता असते. गर्भवती स्त्रीच्या गर्भालाही ध्वनिप्रदूषणा मुळे हानी पोहचू शकते.

वाढत्या नागरी करणामुळे ध्वनी प्रदूषणात देखील वाढ होत असते. रस्त्यावरील वाहतुकीमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाची पातळी वाहनांचा वेग मर्यादित ठेवून, ध्वनी-अडथळे उभारून, जड वाहनांवर मर्यादा घालून, रस्त्यांच्या पृष्ठभागांमध्ये बदल करून, किंवा टायरच्या रचनेत बदल करून कमी करता येते. विमानांमुळे निर्माण होणारा ध्वनी सुधारित इंजिन बदलून तसेच त्यांच्या मार्गात बदल करून कमी करता येतो. तसेच दैनंदिन व्यवहारात शक्यतोवर हळू आवाजात बोलून, गाणी ऐकताना आजूबाजूच्या लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेऊन, उपकरणांची व वाहनांची नियमित देखभाल करून, आवश्यक असेल तरच हॉर्नचा वापर करून व फटाक्यांचा वापर टाळून ध्वनी प्रदूषणाची तीव्रता कमी करता येते.
Similar questions