India Languages, asked by engineerkanil5347, 11 months ago

Speech in Marathi language

Answers

Answered by halamadrid
2

■■मराठीत भाषणाचे एक उदाहरण:■■

■■ 'जीवनामध्ये खेळाचे महत्व' या विषयावर भाषण:■■

या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांचे आणि विद्यार्थ्यांचे मी मनापासून स्वागत करते.आज आपल्या शाळेने आयोजित केलेल्या खेळ दिवसानिमित्त मी इथे 'जीवनामध्ये खेळाचे महत्व' या विषयावर थोडं बोलू इच्छिते.

खेळ आणि क्रीडा प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्वाची भूमिका बजावतात. घरामध्ये किंवा बाहेर खेळले जाणारे कोणत्याही प्रकारचे खेळ शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये सुधार आण्यास मदत करते.

खेळ आपल्याला इतरांशी संवाद साधण्यास,आपला पराभव सन्मानाने स्वीकारण्यास आणि ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे शिकवते.खेळ आपले आत्मविश्वास वाढवण्यास आणि व्यक्तिमत्व घडवण्यास मदत करते. खेळामुळे तणाव दूर होतो आणि आपले मन शांत होते.

त्यामुळे आपण आपल्या व्यस्त जीवनातून थोडा वेळ काढून स्वत: ला एखाद्या प्रकारच्या खेळात व्यस्त केले पाहिजे जेणेकरून आपले मन सकारात्मक आणि शरीर तंदुरुस्त आणि निरोगी राहील.

धन्यवाद!

Similar questions