speech in Marathi on pollution
Answers
Answer:
brainlist plz plz plz
Explanation:
प्रदूषण’ फार-फार ‘सामान्य’ म्हटलं तर, ‘कॉमन’ विषय आहे. ‘प्रदूषण’ म्हणताच डोळ्यापुढे धूळ-धूर, ---जमीन, घाण पाणी कच-याचे ढीग येतात. कानात कर्कश ‘हॉर्न’ वाजू लागतात आणिक विचार केला की, ह्याचे प्रकार ‘जल प्रदूषण’, ‘वायू प्रदूषण’, ‘मृदा प्रदूषण’, ‘ध्वनी प्रदूषण’ लक्षात येतात...आणखी खोलवर गेलो की ह्याची कारणे पण आढळतात. वाहनांचा धूर, कारखान्यातून निघणारी विषारी रसायने. झाडांची-वनांची नासधूस प्लास्टिकचा प्रयोग इतर सर्वांना सर्व माहित आहे. अगदी पाचवी-सहावीची मुले पण ‘प्रदूषणाचे प्रकार, त्याची कारण त्याची निवारणं धडाधडा सांगतील. मोठी समजूतदार मंडळी तर अगदी वैज्ञानिक दृष्टीकोन मांडून ‘प्रदूषणाचे विकराळ रूप आपल्या समोर मांडतील.
थोडक्यात ‘कळतंय पण वळत नाही’ असे झाले आहे. कां? हे सर्व माहिती असून देखील प्रदूषण कमी होत नाही. कारण? आपण आजवर वैज्ञानिक किंवा गौण प्रकार कारणं आणि त्याचे निवारण ह्यावरच विचार केला आहे. मुख्य किंवा मानसिक/आंतरिक प्रकारावर कारणांवर विचारच केला नाही.
‘प्रदूषणाचा’ मुख्य प्रकार आहे मन आणि मस्तिष्क प्रदूषण आणि हाच तो प्रकार ज्यावर मुख्य कारणे अवलंबून आहे. आपण ‘वायू प्रदूषणाबद्दल बोलतो, पण वाहतुकीची साधने, त्यातून निघणारा धूर, झाडांना कापून तेथे इमारती बांधणे. पुल, फ्लायओव्हर काढणे ह्या सा-यावर बंदी लावली कां? आपण अंगणाच्या जागेवर एक ‘एक्स्ट्रारूम’ बांधतोच ना? आधी घरात झाडे असायची, जास्त आणि फर्नीचर कमी. पण आज उलट झालं आहे. फ्रीज, ए.सी. ह्यातून निघणारी विषारी गॅस’ क्लोरोफ्लोरो ‘कॉर्बन’ वायूमंडळासाठी नुकसानदायक आहे. पण आज घरोघरी ए.सी., फ्रीज आहेतच नं? आधी आपण सायकल किंवा ‘पब्लिक ट्रांसपोर्ट’ जास्त वापरायचो पण आज घरोघरी दुचाकी वाहन आणि कार आहे. ‘बस’ किंवा ‘टैंपो’ मधे बसणे म्हणजे ‘कमीपणा’ वाटतो. वेळ वाया जातो, इ..