Speech on Farmers in Marathi.
मराठी भाषण शेतकरी
Answers
मराठी भाषण शेतकरी :
भारत हा एक कृषी प्रधान देश आहे. भारतात ८०% लोक शेती करतात. येथील लोकांचा शेती हा पारंपरागत व्यवसाय आहे. त्या व्यवसायावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. शेतकरी आपल्या शेतात खुप कष्ट करतो. त्याचे काम शेत नांगरणे, बी-बियाणे पेरणे, पिकांना पुरेसे पाणी देणे, पिक घेणे हे असते. आताच्या काळात शेतीची बरीच प्रगती झाली आहे. नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहे . त्यामुळे शेतीची कामे लवकर होतात. पण अजुनहि काही शेतकरी अशिक्षित असल्यामुळे ते जुन्याच पध्दतीचा वापर करत आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही म्हणून शेतकरी अजूनही गरिब आहे . आपल्या घराचा खर्च भागवण्या करता तो शेती पूरक गाय ,म्हैस पालन , त्यापासून मिळणारे दूध विक्री असे व्यवसाय करतो. काही वेळेला नैर्सगिक आपत्ती मुले पण शेतकर्याचे मोठे नुकसान होते. पण जर शेतकरी नसता तर आपल्याला अन्न धान्य कोठून मिळाले असते याचा विचार सगळ्यांनी करायला हवा . लाल बहादूर शास्त्री यांनी म्हटलेच आहे ना 'जय जवान जय किसान ' हे खरे आहे.
नमस्कार मित्रांनो
आपल्या देशाचा नारा जय जवान जय किसान आणि जय विज्ञान आहे.
त्यापैकी शेतकरी जो सर्वांना खाद्यांना पुरवितो हे सर्वांनाच माहिती आहे. शेतकरी शेती करतो आजही भारत देशात 80 टक्के पेक्षा जास्त लोक शेतीवरच उदरनिर्वाह करतात त्यामुळेच भारत देशाला कृषिप्रधान देश असे म्हणतात
शेतकरी कोणत्याही ऋतूची पर्वा न करता आपले काम चोखपणे करत असतो शेतीमध्ये पिकांची लागवड करणे नांगरणी खुरपणी करणे पिकांची काढणी इत्यादी कामे तो करतो. शेतकऱ्याला ना थंडी ची पर्वा न उन्हाची चिंता. कोणत्याही परिस्थितीमध्ये तो शेतीचे काम करणे सोडत नाही.
आज आपण त्याच अन्नदाता म्हटले तरी वावगे ठरणार नाही कारण त्यांनी आपले कार्य थांबविले तर विचार करा मित्रांनो आपण खाणार काय?
सध्याच्या परिस्थितीमध्ये हाच बळीराजा संकटांमध्ये आहे शेती हा व्यवसाय निसर्गाने साथ दिली तरच व्यवस्थितपणे करता येतो निसर्गाचा असमतोलपणा गारपीट दुष्काळ इत्यादी समस्या ने आजचा शेतकरी ग्रासलेला आहे
अन्नदाता संकटात आहे त्यासाठी शासनाने केलेल्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्नशील राहिले पाहिजे.