India Languages, asked by manjubora8058, 1 year ago

Speech on ganesh chaturthi in marathi- गणेश चतुर्थीवर भाषण तयार करा

Answers

Answered by Ishwarsuvasiya
0

गणेश चतुर्थीच्या दिवशी विविध रूपात गणेशाची पूजा केली जाते. या मूर्ती तयार करणे ही एक अद्वितीय अशी कला आहे ज्यातून निराकारापर्यंत पोहोचता येते. गणेश स्तोत्रातही गणेशाच्या स्तुतीपर वर्णनात हेच सांगितले आहे. आपण आपल्या चेतनेतील श्री गणेशाची प्रार्थना करतो की त्याने आपल्यासमोर मूर्तीच्या रूपात यावे जेणे करुन आपण काही काळ त्याच्याशी रममाण होऊन शकू, हसत खेळत संवाद साधू शकू. ठराविक दिवसांनंतर त्यांची प्रार्थना करतो की ते जिथून आले तिथे म्हणजे आपल्या चेतनेत त्यांनी निघून जावे. आपण गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून त्याची पूजा करतो म्हणजे त्याच्याकडूनच मिळालेल्या गोष्टी आपण त्यालाच अर्पण करत असतो.

ठराविक दिवसांनंतर मूर्तीचे विसर्जन केले जाते. यातून आपल्याला हे कळते की ईश्वर मूर्तीमध्ये नाही. तो तर आपल्यातच आहे. अशा प्रकारे सर्वव्यापी असलेल्या ईश्वराला साकार रुपात अनुभवणे आणि त्याचा आनंद घेणे हीच गणेश चतुर्थी मागची मूळ भावना आहे. गणेश चतुर्थी म्हणजे उत्सव आणि पूजा तसेच उत्साह आणि भक्तीचा समन्वय आहे. श्री गणेश हा आपल्यातील अनेक चांगल्या गुणांचा देव आहे. आपण जेंव्हा त्याची पूजा करतो तेंव्हा ते गुण आपल्यातही खुलू लागतात. जिथे जडता असेल तिथे ना ज्ञान असते ना बुद्धी असते ना प्रगती. त्यामुळे चेतनेला जागृत करणे आणि चेतनेचा अधिकार जाणणे म्हणजेच गणेश आहे. आपल्यातील हीच चेतना जागृत व्हावी म्हणूनच प्रत्येक पूजेच्या आधी गणेशाची पूजा केली जाते.

अशाप्रकारे मूर्तीची स्थापना करून प्रेमाने पूजा करण्याने आणि त्याचे ध्यान करण्याने आपल्याला आपल्यात गणेशाचा अनुभव घेता येतो. आपल्यातील गणेश तत्वाला जागृत करणे हीच गणेश चतुर्थी मागची खरी भावना आहे.

Answered by Mandar17
1

गणेश चतुर्थी म्हणजे विद्येचे आद्यदैवत भगवान गणेशल ह्यांचे जन्मदिवस साजरा करण्याचा एक पर्व. हिंदू धर्मात गणेश चतुर्थीला खूप महत्वाचे आणि आदराचे स्थान आहे. गणेश चतुर्थीला विनायक चतुर्थी असे हि म्हटले जाते. तसे तर गणेश चतुर्थी संपूर्ण भारतात साजरी केली जाते पण महाराष्ट्रात याची महिमा वेगळीच.  

तसे तर गणेश चतुर्थी आपल्या घरी म्हणविण्याची परंपरा पुरातन काळापासून चालत आहे. पण सामूहिक गणेश चतुर्थी साजरा करण्याचा आरंभ शिवाजी महाराजांनी पुणे येथून केला. काही काळांनी जेव्हा ब्रिटिशांनी भारताला गुलाम केले. तेव्हापासून सार्वजनिक गणेश चतुर्थी ची कल्पना लोप पावली. आणि गणेश चतुर्थी पुन्हा घरातच साजरी होण्याला सुरुवात झाली.  

पुढे स्वातंत्र्याच्या लढा आपल्या थोर लोकांनी इंग्रंजांसोबत सुरु केला. ह्या काळात एका जागी लोक गर्दी करून उभे राहू शकत नव्हते. सामूहिक बैठक होऊ शकत नव्हती. त्याच वेळी गणेश चतुर्थी चे महत्व ओळखून लोकमान्य टिळकांनी पुन्हा १८८५ मध्ये त्याला सार्वजनिक आणि सामूहिक रित्या पार पाडण्याचे ठरविले. त्यासाठी ते पूर्ण शहरभर सामूहिक यात्रा पण करत. आणि गणेश चतुर्थी पार पाडण्यास लोकांना आग्रह करत. त्या अर्थी ते धार्मिक आणि राजकीय दोन्ही उद्देश्य पार पाडत.

Similar questions