Speech on goa liberation day in marathi language - गोवा मुक्ती दिवसावर भाषण लिहा
Answers
गोवा हा कोकण पट्टीवरील भारताचा एक प्रमुख राज्य. गोव्यात सुमारे ४५० वर्षे पोर्तुगीजांनी राज्य केले. १५ आगस्ट १९४७ ला भारत इंग्रजांच्या तावडीतून स्वतंत्र झाला परंतु गोवा अजूनही पोर्तुगिजांचा तावडीतच होता. १९६१ साली स्वतंत्र भारताच्या वतीने ऑपरेशन विजय हि मोहीम पोर्तुगीजांविरुद्ध राबविली गेली आणि १९ डिसेंबर १९६१ ला गोवा पोर्तुगिजांचा वसाहतीतून मुक्त झाला. १९८७ ला गोव्याला संपूर्ण राज्याचा दर्जा प्राप्त झाला. आज गोव्याची राजधानी पणजी आहे.
गोवा १९ डिसेंबर १९६१ ला मुक्त झाला तेव्हापासून १९ डिसेंबर ला गोवा मुक्ती दिवस म्हणून साजरे केले जाते. ह्या दिवशी गोव्यात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. आणि त्या कार्यक्रमांचा माध्यमातून गोवा मुक्ती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांना आणि ज्यांनी गोवा मुक्ती प्रित्यर्थ आपले प्राण पणाला लावले अश्या थोर हुत्यात्म्यांना स्मरण केले जाते.
Answer: