India Languages, asked by raunak2511, 1 year ago

Speech on importance of sports in our life in marathi

Answers

Answered by lordansh
4
search on Google chrome
Answered by halamadrid
4

Answer:

या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या आदरणीय मुख्यधापक सर,माननीय शिक्षकांचे मी अभिवादन करते आणि माझे सगळे विद्यार्थी मित्र मैत्रीणींचे मनापासून स्वागत करते.आज आपल्या शाळेने आयोजित केलेल्या खेळ दिवसानिमित्त मी इथे 'जीवनामध्ये खेळाचे महत्व' या विषयावर थोडं बोलू इच्छिते.

खेळ आणि क्रीडा प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्वाची भूमिका बजावतात. घरामध्ये किंवा बाहेर खेळले जाणारे कोणत्याही प्रकारचे खेळ शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये सुधार आण्यास मदत करते. हे आपल्याला इतरांशी संवाद साधण्यास,आपला पराभव सन्मानाने स्वीकारण्यास आणि ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे शिकवते.

हे आपल्यासमोर आलेल्या कठीण परिस्थितिंचा सामना आपण कशा प्रकारे करावे,हे शिकवते.हे आपले आत्मविश्वास वाढवण्यास आणि व्यक्तिमत्व घडवण्यास मदत करते. कठोर परिश्रम ही यशाची गुरुकिल्ली आहे असे खेळामुळे शिकता येते. खेळामुळे तणाव दूर होतो आणि आपले मन शांत होते.

त्यामुळे आपण आपल्या व्यस्त जीवनातून थोडा वेळ काढून स्वत: ला एखाद्या प्रकारच्या खेळात व्यस्त केले पाहिजे जेणेकरून आपले मन सकारात्मक आणि शरीर तंदुरुस्त आणि निरोगी राहील.

धन्यवाद!

Explanation:

Similar questions