Speech on importants of cleanness in Marathi for std 9
Answers
स्वच्छतेचे मंत्र जो जोपासतो, तो खरोखर पवित्र आत्माच होय. स्वच्छतेपायी आरोग्य, यश, वैभव आणि लक्ष्मी आपोआप दारी प्रवेश करतात असे म्हटले जाते, आणि ते अक्षरशः सत्य आहे. स्वच्छ असण्याची, स्वच्छ ठेवण्याची आणि स्वच्छ करण्याची सवय हि बालपणापासूनच जोपासावी. आपले थोर महात्म्यांनी आणि संतांनी स्वच्चतेचे महत्व आपल्या अभंगातून आणि भजनातून पटवून दिले आहे. महाराष्ट्राचे स्वच्छतेचे आद्य संत श्री गाडगे महाराज यांनी तर आपले पूर्ण जीवन समाजाला स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी झोकून टाकले.
"स्वच्छतेघरी आरोग्य, सिद्धी नांदी" हि म्हणं अक्षरशः सत्य आहे. आज आपल्या समाजात अस्वच्छतेपायी नानातऱ्हेचे रोग होत आहेत. वैयक्तिक जीवनात आजारावर होणाऱ्या खर्चामुळे दैनंदिन जीवनावर प्रतिकूल परिणाम पडत आहे. शिवाय शासनाचेही वित्तीय संकल्प बिघडत आहे. दवाखान्यात एकच ओरड सुरु असते. ते सगडे अस्वच्छते पायी.
म्हणून आपले राहणीमान, आपले वैभव, आरोग्य आणि शेवटी पैसा वाचविण्यासाठी आपल्याला स्वच्छतेवर जास्तीत जास्त भर द्यावा लागेल. फक्त शरीर स्वच्छ ठेवूनच काम चालणार नाही, तर आपले परिसर, आपले वस्त्र, आपला पाणी स्वच्छ ठेवण्यावर भर द्यावा लागेल. जेणेकरून विजातीय तत्व, दुर्दैव आणि रोग आपल्या जीवनात कधीच डोकावू शकणार नाहीत.