India Languages, asked by PragyaTbia, 1 year ago

Speech on mahaparinirvan din in marathi - महापरिनिर्वाण दिवसावर भाषण

Answers

Answered by Mandar17
4

थोर समाजसुधारक, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यू दिवस आपण महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा करतो. दरवर्षी महापरिनिर्वाण दिवस आपण ६ डिसेंबर ला साजरा करतो.  

डॉ. आंबेडकरांनी आपल्या जीवनात खूप अन्याय सहन करून आणि अतोनात कष्ट सहन करून शिक्षण पूर्ण केले. त्यांचा पूर्ण आयुष्यात हिंदू धर्मातील चातुर्वर्ण्य व्यवस्था त्यांना त्रास देत होती, म्हणून त्यांनी असे जाणले कि जो पर्यंत हिंदू समाजात चातुर्वर्ण्य प्रथा अस्तित्वात आहे, तो पर्यंत अस्पृश्य समाजाचे तरणोपाय हिंदू धर्मात राहून होऊ शकत नाही. म्हणून १९३५ रोजी त्यांनी घोषणा केली कि, "हिंदू धर्मात मी जन्माला आलो ह्याचा माझ्यावर नियंत्रण नव्हता, पण मी हिंदू धर्मात मरणार नाही. आणि १४ ऑक्टोबर १९५६ ला त्यांनी सार्वजनिकरित्या बुद्ध धर्माचा अंगीकार केला.  

बुद्धधर्मानुसार, मनुष्याची मुक्ती होणे म्हणजे त्याला निर्वाण प्राप्त होणे असा होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ६ डिसेंबर १९५६ ला मरण पावले. आणि म्हणून आम्ही ६ डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा करतो.

Similar questions