India Languages, asked by pankajpankajg83131, 1 year ago

Speech on mahatma phule in Marathi - महात्मा फुलेंवर भाषण

Answers

Answered by karanpatil38820
13

जोतीराव गोविंदराव फुले (एप्रिल ११ , इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८, इ.स. १८९०), महात्मा फुले नावाने प्रसिद्ध, हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती. ही पदवी त्यांना इ.स.१८८८ या साली मिळाली. 'शेतकऱ्यांचे आसूड' हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला होता

जोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोऱ्हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला. तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत.

जोतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी झाला. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. इ.स. १८४२ मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. [२]

शैक्षणिक कार्य

संपादन करा

महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत:

विद्येविना मती गेली ।

मतीविना नीती गेली ।

नीतीविना गती गेली ।

गतीविना वित्त गेले ।

वित्ताविना शूद्र खचले।

इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।

बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी इ.स. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाडयात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत इ.स.१८५२ मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. जोतीरावांनी पत्‍नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते.

Answered by Mandar17
8

मा. फुलेंचा पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते. त्यांचा आईचे नाव चिमणाबाई फुले होते. मा. फुलेंचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण ह्या गावी झाला. त्यांचा पत्नीचे नाव सावित्रीबाई फुले होते. त्यांचे पूर्वज फुलांचे उद्योग करीत असत म्हणून त्यांना फुले हे उपनाम पडले.  

मा. फुले हे एक थोर समाज सुधारक होते. त्यांनी सत्य शोधक समाजाची स्थापना केली. त्यांचे असे मत होते कि, ईश्वर हा निर्मिक आहे, त्याला प्राप्त करण्यासाठी कसल्याही थोतांडाची आणि स्व-घोषित ईश्वराच्या दलालांची आवश्यकता नसते. त्यांचे असेही मत होते कि, निर्मिकाने सर्व विश्व निर्माण केले म्हणून सर्वजण समान आहेत, ते जातिप्रथेचे आणि सामाजिक असमानतेचे घोर विरोधी होते. त्यांनी ब्राह्णचे कसब, शेतकऱ्यांचे आसूड, गुलामगिरी, असपृशयांची कैफियत अशी अनेक पुस्तके लिहिली.  

१९८८ वर्षी मुंबईत त्यांना महात्मा ही पदवी देण्यात आली. मा. फुले एक थोर विचारवंत, समाजसेवक, समाजसुधारक, साहित्यिक आणि जननेते होते. त्यांचा मृत्यू २८ नोव्हेंबर १८९० रोजी पुणे येथे वयाच्या ६३व्या वर्षी झाला. त्यांचे विचार प्रत्येक पिढीतील लोकांना समाजसुधारणेसाठी प्रेरित करीतच राहतील.  

Similar questions