India Languages, asked by CrizMack4717, 1 year ago

Speech on Marathi Day in Marathi: भाषण मराठी दिवस वर

Answers

Answered by Mandar17
17

महान मराठी कवी कुसुमाग्रज म्हणजे विष्णु वामन शिरवाडकर  यांचा जन्म दिवस २७ फेब्रुवारी हा “मराठी भाषा दिवस” म्हणुन साजारा केला जातो. मराठी भाषा ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे . मराठी भाषा ही खुप श्रीमंत भाषा आहे. तीला साहित्य आणि इतिहासाची किनार आहे. संतांचे अभंग, किर्तने , भजन ,भारुड यांनी ती सजलेली आहे. प्रत्येक मराठी माणसाला मराठी भाषेचा अभिमान आहे. मराठी भाषेला १५०० वर्षाचा इतिहास आहे. जगभरात सगळीकडे मराठी माणुस आहे तेथे मराठी दिन साजरा केला जातो. या दिनाला मायबोली भाषा दिन , जगतिक मराठीभाषा दिन असेही म्हणतात.

Answered by manoj9907
8

Answer:

महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४' नुसार महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे घोषित झाले. 'मराठी भाषा गौरव दिन' दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी श्री विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी इ.स. २०१३ रोजी घेण्यात आला.

"मराठी राजभाषा दिन" ' मराठी दिन' हा १ मे रोजी साजरा करण्यात येतो. १ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्या दिवसापासून मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला. म्हणून १९९७ पासून १ मे हा दिवस 'राजभाषा मराठी दिन'म्हणून साजरा करण्यात यावा असा शासनाने निर्णय घेतला. दिनांक १० एप्रिल १९९७ रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाद्वारे हा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Explanation:

mark me as brilliant

Similar questions