speech on mazya swapnitil bharat in marathi ?
Answers
Answer:
देश! देश म्हटलं की त्याला भूत, वर्तमान आणि भविष्य असतंच! भूतकाळ पाठीमागे खूप काही ठेवून गेलेला असतो जसं की चुका, सुधारणा, चांगल्या-वाईट आठवणी आणि असं बरंच काही जे वर्तमानाशी सांगड घालून त्याचं एक उज्वल भविष्य बनवता यावं. या भविष्यासाठी खरंतर एक अथवा अनेक स्वप्नं असतील आणि ती स्वप्नं प्रत्येक देशवासी आपल्या देशासाठी नक्कीच पहात असेल. खरंतर आजतागायत आपला भारत देश जी परिस्थिती जगतोय, पाहतोय, अनुभवतोय त्या अनुषंगाने भारतासाठी माझी स्वप्नं खरंतर या देशाच्या प्रत्येक सुजाण नागरिकासारखीच आहेत किंवा असावीत! देशाच्या इतिहासाकडे निरखून पाहताना उद्याचं भविष्य त्या इतिहासापेक्षाही अजरामर व्हावं आणि ते मी इतिहासाच्या पानांतून जाणलेल्या रामराज्यागत किंवा मग शिवरायांच्या स्वराज्यासारखं अभिप्रेत व्हावं अशी इच्छा व्हायला लागते! कदाचित आजच्या आणि उद्याच्या घडीचा विचार करता तांत्रिक, वैज्ञानिक आणि परिस्थितीजन्य बाबींचा अभ्यास करता ते भविष्याला पूरक ठरेल की नाही हे याक्षणी सांगू नाही शकत. कारणही त्याला अगदी तसंच आहे! आपण जे वर्तमानात संस्कृतीची, विचारांची बीजे आपल्या पिढीमध्ये पेरत आहोत कदाचित भविष्यातील पिढी हा वसा आपल्या दृष्टीने पेलवतील की नाही या बाबत मात्र शंका वाटायला लागते.
मी जगत असलेली जाती-पातीची घुसमट, आपापल्या धर्म स्वाभिमानापोटी दाखवली जात असलेली समाजातील अक्षम्य विषमता, काही लोकांचा स्व विचारांनी आणि स्वतःच्या वैचारिक बुद्धीने कलह मांडलेला असामाजिक विचार, राजकीय अशक्तपणा, दूषित झालेला समाज प्रवाह मनाला कुठेतरी हताश करून सोडतो. तिथूनच खरंतर मग माझ्या स्वप्नातला भारत मी उघड्या डोळ्यांनी साकारायचा प्रयत्न करू लागतो. जे आज माझ्याजवळ आहे त्याचं स्वप्नं मी का पाहू? किंवा मी जे अनुभवलंय त्याला परत स्वप्नंवत करायचा मी खोटा आटापिटाही का करू? पण मी जे पाहिलंच नाही, ज्याची अनुभूती करण्याची मला प्रबळ इच्छा आहे ती स्वप्नं मी माझ्या देशासाठी नक्कीच पाहिल! माझी माझ्या देशाबद्दलची स्वप्नं तेजोमय होण्याकरिता असतील पण ती स्वप्नं मी उघड्या डोळ्यांनी पाहतो असेल तर त्या तेजोमय स्वप्नांना अंधारी येऊ नये ही मनोमन कामना देखील मी करत असेल.
स्वप्न होतात साजिरे ती होतात गोजिरे।
वैभव येण्या स्वप्नापरि स्वप्न यावी पहाटे।।
अशी साजिरी-गोजिरी स्वप्न प्रयत्नांती पहाटे येत असतात आणि ती पहाट होण्यासाठी सुखनिद्रेची फळे चाखवी लागतात याची कल्पना सर्वाठायी असेलच!
माझा देश जाती-पातीच्या दरीतून सावध बाहेर निघत असताना त्याचा पाय कुठेतरी अजूनही त्या गाळात माखून आल्यासारखा वाटत जातो. ती जात खरंतर कायमची धुतली जात आहे असा भारत मी स्वप्नवत पाहतो. धर्मनिरपेक्ष म्हटला जात असला तरी धर्माच्या पोकळ स्वाभिमानाने समाजात जी मोठी पोकळी तयार होत आहे ती पोकळी सुविचार, अभ्यासपूर्ण मतांनी, एकतेच्या कार्यांनी भरून निघतानाचा भारत मी स्वप्नपूर्तीमध्ये पाहतो. या समाजात वैचारिक कलह, सूड बुद्धीचे मर्म, विषमतेचं वारं भरणाऱ्या म्हाताऱ्या आणि भान गेलेल्या विचार बुद्धीचं पानिपत होताना मी स्वप्नानुभवात अनुभवतो. विज्ञानाशी एकरूप होत असताना सुसंस्कृत भारत म्हणून एक विकसित संप्रदाय होताना मी भारतास स्वप्नामध्ये साकारतो. कृषी उन्नती घडत असताना जैविक शेतीची पिकं उभी राहिलेली मी कृषिपूर्ण भारतासाठी स्वप्न पेरतो. शिक्षण आणि शिक्षणाचा दर्जा सुधारताना आणि त्या संपूर्णत्व शिक्षणाने भारताचा एक एक तरुण बेरोजगारीला धूळ चारत जगाच्या नकाशावर प्रगतीचे गाणे गाताना मी स्वप्न पाहतो. माझ्या स्वप्नातला भारत खऱ्या अर्थाने लोकशाहीवादी म्हणला जात असताना तो पूर्णत्वाने देशातील आंतर्गिक कलह मिटवून ताठ मानेने जगासमोर उभा राहताना मी स्वप्नरूपी पाहतो.
i hope it will help you