Speech on my school in Marathi - माझी शाळांवर निबंध लिहा
Answers
I am in Gujarat I don't know Marathi
मी ज्या शाळेत शिकलो ती एक मराठी शाळा आहे. ज्या वेळेस मी शाळेत शिकत होतो त्या वेळेपासून आता च्या शाळेतील इमारतीत खूप बदल झालेला आहे. मला ज्या शिक्षकांनी शिकविलेले आहे, त्यांची जागा आता दुसऱ्या तरुण शिक्षकांनी घेतली आहे. पण एक वस्तू मात्र कधीही बदलणार नाही, ते म्हणजे शाळेतून प्राप्त होणारे संस्कार. ते आमच्या वेळेसही त्याच प्रमाणात होते आणि आताही त्याच प्रमाणात आहे. फक्त ते अंगिकारणाऱ्यांचे चेहरे आणि पात्रता बदलत असते.
मी ज्या वेळेस शिकायचो त्या वेळेस, शाळेला ६ खोल्या आणि एक व्हरांडा होता. मुख्याध्यापकांची केबिनच सर्व शिक्षकांचा स्टाफ रूम होता. त्याला लागूनच एक लहानसा स्वयंपाकघर आणि स्टोर रूम होता. आमची वर्ग व्हरांड्यामध्ये लागत होती. आमच्या शाळेत मुख्याध्यापकांना धरून एकूण ७ शिक्षक आणि एक परिचर होता. माझे माध्यमीक पर्यंतचे शिक्षण गावातील ह्याच शाळेत झाले.
आता परिस्तिथी आणि वेळ दोन्ही बदलले आता माझ्या शाळेला हायस्कूल सुद्धा जोडण्यात आले. आता शाळेला नवीन इमारत, नवीन नाव, नवा स्टाफ लाभलेला आहे. माझी शाळा आता संगणीकृत म्हणजे डिजिटल झालेली आहे. आम्ही जरी शाळेत गणवेशात गेलो नसलो तरी आता सगळे मुले गणवेशात शाळेत येतात. माझ्या शाळेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकल्प राबविले जातात. शाळेतील सर्व शिक्षकवृन्द प्रेमळ आणि मिलनसार स्वभाचे आहेत.
शाळेची हि परिस्तिथी आणि बदलावं पाहून मन पार आनंदाने थकच्च होतो. मला माझ्या शाळेच्या गर्व आहे. आणि शाळेचा विकासासाठी माझ्या परीने जो बनेल ते करण्याची माझी तयारी सुद्धा आहे.