Speech on patriotism in Marathi - देशभक्तीवर मराठीत भाषण
Answers
भक्ती हि जसी भक्ताने आपल्या ईश्वरावर केलेली अनन्य भक्ती आणि श्रद्धाचे ज्वार असते. तसे देशभक्ती हि आपल्या राष्ट्राला किंवा देशाला जीवनापाड केलेली भक्ती किंवा श्रद्धेचे ज्वारच असते. देशभक्ती हि काही दाखविण्याची वस्तू नसून करण्याची क्रिया आहे.
आपल्या देशासाठी काही करण्याची आणि आवश्यकता भासलीच तर प्राण पणाला लावण्याची तयारी हि देशभक्तीची पहिली पायरी असते. कित्येक तरुण ज्यांचे लग्न काही दिवसात होणारच आहे किंवा नुकतेच संपले आहे, ज्यांनी जीवनाला फक्त सुरुवातच केली आहे, असे तरुण आपल्या देशभक्तीच्या विचारापांयी सीमेवर प्राण तळहातावर धरून लढत असतात, कित्येक तर हुतात्मे होतात.
देशभक्ती हि फक्त शरीरावर सिपाही सदरा घालनाऱ्याजवळच असते असे नाही. तर कित्येक लोक विविध मार्गानी आणि आपापल्या परीने देश सेवा करत असतात.
आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणारे स्वत्र्यवीर हे किती देशभक्ती च्या भावनेने भरलेले होते ह्याची क्वचिति ह्यावरूनच येते कि त्यांनी आपला परिवार, आपले कुटुंब आपले नातेवाईक, आपले सुखी जीवन, आपले वैभव हे सुद्धा स्वात्रंत्रयीपायी पणाला लावून दिले. हे सगळे देशभक्तीच्या भावनेपायीच.
पण काही देशद्रोही स्वभावाचे हि असतात जे स्वतःच्या स्वार्थसिद्धीसाठी आपल्या देशाला कोणतीही इजा पोहचविण्यात कसलेही सारासार विचार करत नाहीत. असे लोक जिवंत नरकंकालच होत आणि देशभक्तीची भावना ठेवणारे व्यक्ती हे जिवंत महात्मा होत.