Speech on Pradushan in Marathi
मराठी भाषण प्रदुषण
Answers
प्रदूषण म्हणजे जीवजंतू नष्ट करणारे किंवा विस्कळीत करणारे घटक जे वातावरण, जल आणि भूप्रदेशात मिसळतात.. पृथ्वीजवळ, सुमारे ५० किमी उंचीवर एक उतारमंडल आहे, ज्यामध्ये ओझोनची पातळी आहे. या पातळीमुळे सूर्यप्रकाश अल्ट्राव्हायलेट (यूवी) किरणांपासून मुक्त होऊन पृथ्वीपर्यंत पोचतो. आज ओझोनची पातळी वेगाने विघटित झाली आहे, ओझोनचा थर वायुमंडलीय क्लोरोफ्लोरोकार्बन (सीएफसी) गॅसमुळे विघटित होत आहे.१९८० मध्येओझोन पातळीचे विघटन सर्व पृथ्वीवर होत असल्याचे प्रथम लक्षात आले. दक्षिण ध्रुव विस्तारांमध्ये ओझोन पातळीवरील व्यत्यय 40% -50% आहे. या प्रचंड घटनेला ओझोन होल (ओझोन होल) म्हणतात. ओझोनच्या पातळी कमी झाल्यामुळे ध्रुवीय प्रदेशांवरील बर्फ वितळण्यास सुरवात झाली आहे आणि मनुष्याला अनेक प्रकारच्या त्वचेच्या आजारांचा सामना करावा लागत आहे
मराठी भाषण प्रदुषण :
प्रदुषण ही आताच्या काळात खुप मोठी समस्या आहे. प्रदुषण हे अनेक प्रकाराने होते, जसे जलप्रदुषण, वायुप्रदुषण, मृदा प्रदुषण या तीन प्रकाराने प्रदुषण होते. वातावरणात, पाण्यात, मातीत नको असलेले घटक मिसळले जातात या प्रक्रियेला प्रदुषण म्हणतात. प्रदुषणामुळे पर्यावरणाचे खुप नुकसान होते आणि ते मानवी आरोग्याला हानिकारक आहे. कारखान्यांमधुन निघणारा धुर ,गाड्यांमधुन निघणारा धुर वातवरणात मिसळला जातो त्यामुळे हवेतील ऑक्सिजन चे प्रमाण कमी होवु लागले आहे, यामुळे वायुप्रदुषण होते. तसेच कारखान्यांमधुन रसायन युक्त सांडपाणी नदी, तलाव यांन मध्ये सोडले जाते त्यामुळे जलप्रदुषण होते. अतिरिक्त खतांचा वापर केला जातो त्यामुळे जमीनीची सुपीकता कमी होते त्यामुळे मृदा प्रदुषण होते. वाहनांचा आवाज, मोठ्या आवाजात ऐकु येणारे गाणे यांमुळे ध्वनि प्रदुषण होते. प्रदुषण थांबवण्यासाठी टीव्ही, लाऊड स्पिकरचा आवाज कमी करावा. फटक्यांचा वापर टाळावा. रासायनिक खतांचा वापर कमी करावा. सांडपाण्याचे योग्य ते नियोजन करावे.