India Languages, asked by Mohitkhan1902, 1 year ago

Speech on save girl child in marathi - मुली वाचवणे यावर भाषण

Answers

Answered by Shanaya331990
22

TeenAtHeart

निबंध भाषण • मराठी

बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना मराठी निबंध | Essay on Beti Bachao, Beti Padhao Yojana in Marathi

by Ajay Chavan2018-09-26

Essay on Beti Bachao, Beti Padhao Yojana in Marathi

Beti Bachao, Beti Padhao Yojana is one the most important campaign in India right now. For so long girlsempowerment has been second priority or sometimes negelcted too. It is good to see that goverment is trying to boost the girls confidence, educate them, provide them at least basic facilities so that they prosper. Here in this article we are giving you a sample Essay on Beti Bachao, Beti Padhao Yojana in Marathi. You can use this content for speech, article writing. You can also use it to practice paragraph writing.

भारताला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे उलटून गेली तरीही आजही हुंडाबळी, स्त्रीभ्रूण हत्या आणि स्त्री पुरुष भेदभाव सारख्या लज्जास्पद गोष्टी अजूनही समाजात दिसून येतात. आपण २१व्या शतकांत पोहचुनही आजही महिलांना दुय्यम दर्जा दिला जातो. महिला ह्या समाजाच्या एक महत्वाच्या घटक आहेत परंतु आजकाल महिलांविषयक गुन्हे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अशाच गुन्ह्यांपैकी एक म्हणजे स्त्रीभ्रूण हत्या. वाढत्या स्त्रीभ्रूण हत्येमुळे एकूण लोकसंख्येमध्ये महिलांची आकडेवारी खालावली आहे. खालावत जाणारे लिंग गुणोत्तर आणि समाजाचा समतोल राखण्यासाठी स्त्री भ्रूणाचे संरक्षण करणे हे काळाची गरज बनले आहे, कारण स्त्री आणि पुरुष हे निसर्गाचे एक सामान घटक आहेत.स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी आणि लहान मुलीचे संरक्षण करण्यासाठी भारत सरकारने आणि सामाजिक संस्थांनी खूप अभियाने सुरु केली आहेत. “बेटी बचाओ, बेटी पढाओ” हे अशाच एका अभियानांपैकी एक.

TeenPepTalk Marathi QnA

ह्या लेखामध्ये आम्ही “बेटी बचाओ, बेटी पढाओ” ह्या भारत सरकारने सुरु केलेल्या अभियानाबद्दल उपयुक्त माहिती दिली आहे. ही माहिती तुम्हाला “बेटी बचाओ, बेटी पढाओ” अभियानाबद्दल निबंध, भाषण स्पर्धांमध्ये आणि लेख लिहण्यास उपयुक्त ठरेल. तुम्ही तुमच्या गरजेनुसार ही माहिती पुनर्रचित करू शकता. चला तर मग सुरु करूया.

बेटी बचाओ, बेटी पढाओ / लेक वाचवा लेक शिकवा अभियान मराठी निबंध

भारताला तंत्रज्ञान, शिक्षण, विज्ञान, साहित्य, राजनीती, समाजसेवा अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप मोठा वारसा लाभला आहे. खूप अशा भारतीय महिला स्वातंत्र्य सेनानी, खेळाडू, शास्त्रज्ञ, समाजसेविका, अभिनेत्री, आणि नेत्यांनी भारताचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले आहे. राणी लक्ष्मीभाई, अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ, आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई फुले, सरोजिनी नायडू, विजयालक्ष्मी पंडित, मदर तेरेसा,कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, सानिया मिर्झा, सायना नेहवाल, साक्षी मलिक, पी व्ही सिंधू अशा काही इतिहासातील आणि अलीकडच्या काळातील कर्तबगार महिलांची नावे आहेत.

जीवन जगणे हा माणसाचा मूलभूत हक्क आहे आणि स्त्रीभ्रूण हत्या करून लोक तो हक्क क्रूरपणे हिसकावून घेत आहेत. ११ ऑक्टोबर ला पूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय बालिका शिशु दिवस (International Girl Child Day) साजरा केला जातो. ह्या दिवशी मुली आणि महिलांबद्दलच्या समस्या जसे कि लैंगिक भेदभाव, स्त्रीभ्रूण हत्या आणि शिक्षण, आरोग्य सेवा यांमध्येही सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या समस्यांमद्धल जनजागृती केली जाते व ह्या समस्यांचे निर्मूलन करण्याचे प्रयत्न केले जातात. ह्या दिवशी बालविवाह, महिलांवर होणारे अत्याचार ह्यांबद्दल ही जनजागृती केली जाते. अशा सर्व समस्यांशी दोन हात करण्यासाठी भारत सरकारने “बेटी बचाओ, बेटी पढाओ” हा अभियानाची सुरुवात केली आहे. मुलगी वाचवा आणि मुलगी शिकवा हा संदेश ह्या अभियानामार्फत दिला जात आहे. ह्या अभियानाला मराठी मध्ये लेक वाचवा लेक शिकवा अभियान असेही म्हटले जाते.

Answered by Mandar17
28

मुली ह्या देवाघरची फुली असतात. प्रकृतीने बनविलेली अद्भुत रचना म्हणजे मुलगी. हीच उद्याची स्त्री. स्त्री हि कुणाची बहीण, कुणाची लेक, कुणाची आई, कुणाची पत्नी आणि कुणाची मैत्रीण असते. ह्या चिमुकल्या मुलींमधूनच उद्याचा जिजाऊ,  सावित्रीबाई, लक्ष्मीबाई , इंदिरा गांधींचा उदय होणार आहे. उद्या सगळीकडे काळोख संपून जग प्रकाशमान करण्यासाठी मुली वाचवा मुहिम हाती घेऊया.  

अस्या होतकरू आणि ज्यांच्यामुळे मनुष्याचे पूर्ण जीवन आणि त्याची वंशावळी अवलंबून आहे अस्या स्त्री जातीला त्यांचा बालवयातच  काही निरक्षर आणि परंपरागत लोक खूप यातना देतात. काही तर मुलगी नको म्हणून भ्रूण हत्या करतात.काही मुलींना बालमजूर बनण्यास बाध्य करतात. अश्या लोकांमध्ये काही रूढीवादी महिलांचा सुद्धा समावेश आहे.  अस्या महिला आपण सुद्धा एक स्त्री आहोत हे सत्य विसरून जातात.  

आपल्या संस्कृतीमध्ये स्त्री जातील खूप महत्व आहे. "यत्र नारयस्तू  पूज्यन्ते, रम्यत्ये तत्र देवतः" म्हणजे जिथे स्त्रीचे आदर आणि सम्मान केले जाते, तिथे ईश्वराचा वास असतो. असे आपल्या शास्त्रात नमूद केले आहे. तरी आपण बाळ मुलीवर अन्याय सहन कसे करतो, हे विचारणीय आहे. मुलगी हि आपले घर आणि सासरवाडीचे घर, दोन्ही प्रकाशमान करते. आजची मुलगी हि उद्याचा भविष्य आहे. चला एक पाऊल आपण ह्या चिमुकल्या मुलींना सर्व यात्नापासून वाचविण्यासाठी उचलुया.

Similar questions