India Languages, asked by raiakash2996, 10 months ago

Speech on send off for std 10 in Marathi - १० विच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभावर मराठीत भाषण

Answers

Answered by Mandar17
9

१० विच्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी निरोप समारंभ आयोजित करण्यात येते. त्याचे मुख्य उद्देश्य दहावीतून समोर जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुनेरी भविष्याची वाट मंगल करणे आणि दहावीत पदार्पण करणाऱ्या विद्यार्थाना मार्गदर्शन लाभावे हे असते.  

दहावीतून समोरच्या वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात पहिली पासून दहाव्या वर्गापर्यंतच्या एकच शाळेत घालविलेल्या खूप आठवणी आणि खूप अनुभव सुद्धा असतात, वेळोवेळी शिक्षकांनी पुरविलेल्या माहिती आणि मार्गदर्शन दहावीच्या विद्यार्थांनी आत्मसात केलेले असते. आणि तीच माहिती, तेच मार्गदर्शन आपल्या मागे येणाऱ्या विद्यार्थी भावंडांना लाभो हे निरोप समारंभामागचे उद्देश असते.  

ह्याच कारणास्तव निरोप समारंभाला उपस्थित असणाऱ्या विद्यार्थीजन, शिक्षकवृन्द ह्यांचे डोळे जुन्या आठवणीने भारावलेले असतात. पण जीवनात समोर काहीतरी करण्याची एक अतृप्त इच्छा मनात खेळत असते. निरोप देणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सुद्धा हे आपले विद्यार्थी समोर जाऊन काहीतरी विशेष करतील अशी एक अशा असते. आणि हि आशा, हि इच्छा मनाला आनंदित पण करत असते.

हेच विचार जेव्हा विद्यार्थी आपल्या भाषणाच्या माध्यमातून मांडतात तेव्हा मन त्यांच्या आतापर्यंत शाळेत घालविलेल्या आठवणीने भारावून जातो. आणि दुसऱ्या क्षणी, ते भविष्यात समाजासाठी आणि देशासाठी काही करतील ह्या कल्पनेने गहिवरून जातो.

Similar questions