speech on teachers day in marathi
Answers
५ सप्टेंबर ह्या दिवशी दरवर्षी भारतात आपण शिक्षक दिवस साजरा करतो. आपण शिक्षक दिवस १९६२ पासून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जयंतीनिमित्त साजरा करतो. ह्या दिवशी शाळेतील होतकरू विद्यार्थ्यांचे पुरस्कार देऊन त्यांचे कौतुक केले जाते. आणि ते भविष्यात खूप पुढे जावोत अशी आशा बाळगली जाते.
समाजाला घडवण्यासाठी एका शिक्षकाचे महत्व काय हे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ह्यांनी अगदी बरोबर हेरले होते. म्हणून जेव्हा काही विद्यार्थी डॉ. राधाकृष्णन ह्यांच्याजवर त्यांची जयंती साजरी करण्याची अनुमती मागण्यास गेले, तेव्हा त्यांनी त्यास नकार देत म्हटले कि, "जर तुम्हाला माझी जयंती साजरी करायची आहे, तर तुम्ही ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिवस म्हणून साजरा करा जेणेकरून ह्या समाजातील सर्व शिक्षकवृन्दाचा आदर होईल". तेव्हापासून आपण शिक्षक दिवस ५ सप्टेंबर रोजी साजरा करतो.
खरंच, शिक्षक हा समाजाचा आरसा आहे, तो जसे जग दाखवेल तसेच आपल्याला जगाचा भास होईल. म्हणून आम्ही अस्या गुरुवर्गाला ह्या शिक्षक दिवशी नमन करतो.