India Languages, asked by dollychaudhary4433, 1 year ago

Speech on tree plantation in Marathi ; वृक्षारोपणावर भाषण

Answers

Answered by Mandar17
7

वृक्षारोपण  ही काळाची गरज आहे. वृक्षतोडीमुळे होणारे  दुष्परिणाम आपण  अनुभवतोच. आज दिल्ली सारख्या शहराचे प्रदूषणामुळे काय हाल झाले आहेत, ते आपण समाचार माध्यमाद्वारे दरदिवशी पाहतोच. आज दिल्लीच्या लोकांना प्रदूषणाच्या वाढत्या स्तरामुळे जीवन जगणे कठीण झाले आहे. हि अवस्था उद्या पूर्ण भारताची आणि जगाची हि होऊ शकते.  

ह्या जागतिक समस्यांचे निदान फक्त आणि फक्त वृक्षारोपण हे आहे. वृक्षारोपणामुळे फक्त प्रदूषणाच्या समस्येवर मात करता येते असे नाही तर, वृक्षारोपणामुळे सैरावैरा धावत असणारे ढग झाडांच्या दाबामुळे एकजागी एकवटले जातात आणि त्या भागात भरगोस पर्जन्यवृष्टी होते. वृक्षारोपणामुळे मृदेचे क्षरण थांबते. वृक्षरोपणामुळे जमिनीखालील पाण्याचे स्तर वाढते. वृक्षरोपणामुळे पर्यावरण समतोल राहून, रानटी प्राण्यांना आश्रयस्थान प्राप्त होते, झाडे प्राणवायू सोडतात आणि कार्बन डाय ऑक्साइडअवशोषित करतात. असे कित्येक वृक्षारोपणाचे सामाजिक स्तरावर, वैयक्तिक स्तरावर आणि आर्थिक स्तरावर फायदे आहे.  

शासन तर दरवर्षी वृक्षलागवडीची मोहीम आपल्या परीने चालवतच असते, पण सर्व बाजूंनी फायदेशीर झाडांची लागवड प्रत्येक वक्ती ने आपल्या जीवनात आपआपल्या परीने केलेच पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी आपल्या वाढदिवसानिम्मित दर वर्षी २ झाडे लावण्याची शपथ घ्यायलाच पाहिजे.

Answered by annukanojiya1976
1

Answer:

good evening to you and happy

Similar questions