India Languages, asked by digital4962, 1 year ago

Speech on women's education in marathi - स्त्री शिक्षणावर भाषण लिहा.

Answers

Answered by Mandar17
8

आपल्या भारतात स्त्री शिक्षणावर खूप भर देण्यात येतो कारण आताही स्त्रियांची ज्या प्रमाणात उन्नती व्हायला पाहिजे ती आढळून येत नाही. ग्रामीण भागात आताही मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात येत आहे. चूल आणि मूल हेच धोरण पुष्कळस्या ग्रामीण भागातील पुरुषप्रधान समाजाने अंगिकारला आहे. ही स्तिथी असली तरी स्त्रियांनी केलेली प्रगती पाहून मन अभिमानाने ताठ होतो.  

स्त्रीशिक्षणाची गोष्ट होईल आणि सावित्री बाई फुले यांचा उल्लेख होणार नाही हे अशक्य आहे. भारतात स्त्रीशिक्षणाचा पाया सावित्रीबाई फुले ह्यांनी रचला. ज्योतिबा फुले ह्यांनी १८४८ मध्ये सुरु केलेल्या शाळेची शिक्षिका सावित्रीबाई फुले ह्याच होत्या. आणि त्यांनीच प्रथम  मुलींना शिकविणे सुरु केले. आज स्त्रियांना शिक्षणासाठी प्रेरित करण्यासाठी आणि मुली शाळेत यावेत ह्यासाठी विविध स्वयसेवी  संगठन आणि शासन धोरण राबवत आहे. स्त्रियांनीहि स्वइच्छेने शिक्षणाकडे जास्तीत जास्त कौल ठेवावा हि आजची गरज आहे. स्त्रीशिक्षणाशिवाय प्रगत आणि संस्कृत समाजाची कल्पना करणे अवघडच आहे.

Similar questions