Speech writing in marathi on vadhati vyasanadhinta
Answers
Hi bro here is your answer.
Answer:आपला देश हा तरूणांचा, युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. आपल्या देशातील युवकांकडे सहज निखळ मनाने पाहिले तर त्यांची वाटचाल दोन दिशांनी चालू आहे. एक म्हणजे प्रगती, तर दुसरी म्हणजे व्यसनाधिनता.
खरंच जो देश युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. अशा देशातच जर तरून चांगले कार्य करायचे सोडून जर वाईट प्रवृत्तीकडे जात असतील तर ही बाब नक्कीच आपल्या देशासाठी लज्जास्पद आहे. ज्या युवकांमध्ये देशात बदल घडवून आणण्याची शक्ती आहे. आज तोच युवक व्यसनाधिन बनत चालला आहे. त्यामुळे व्यसन ही एक युवकांसाठीच नव्हे तर देशासाठी समस्या बनली आहे.
आपल्या देशाची ‘ शान’ च तरूण आहे. आजचे तरूण हे देशाचे उद्या आधारस्तंभ आहेत. जर तरूणच व्यसनाधीन बनत चालले तर आपल्या देशाचा काय विकास होणार? कोण करणार? अन् कधी करणार? यासरखे अनेक प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहणार नाहीत.
आपल्या देशाचे आधारस्तंभ व्यसनांमध्ये न गुरफटता जर डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा आदर्श डोळ्यासमोर घेऊन शिक्षण घेत राहिले किंवा काम करत राहिले तर आपला देश सुजलम सुफलम व्हायला वेळ लागणार नाही.
Explanation: